Washim News: वाशीम जिल्ह्यात यंदा रब्बी हंगामातील पिकांची लागवड जोमाने सुरू असून, डिसेंबर महिना अर्ध्यावर आलेला असताना रब्बी पेरणीने समाधानकारक टप्पा गाठला आहे. उपलब्ध माहितीनुसार, जिल्ह्यात रब्बी पिकांची लागवड ८२.०५ टक्क्यांपर्यंत पूर्ण झाली आहे. .वाशीम जिल्ह्याचे रब्बीचे सरासरी क्षेत्र १ लाख १८ हजार ७६६ हेक्टर इतके असून, त्यापैकी आतापर्यंत ९७ हजार ४४७ हेक्टर क्षेत्रावर पेरणी आटोपली आहे. वेळेवर मिळालेली थंडी, जमिनीत शिल्लक असलेला ओलावा आणि सिंचनाच्या सुविधेमुळे रब्बी पिकांसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे..Rabi Sowing: सांगली जिल्ह्यात रब्बी पेरा पावणेदोन लाख हेक्टरवर .जिल्ह्यात रब्बी हंगामात प्रामुख्याने हरभरा आणि गहू ही पिके घेतली जातात. यंदाही शेतकऱ्यांचा भर हरभऱ्याच्या पेरणीवर दिसून येत आहे. हरभऱ्याचे सरासरी क्षेत्र ७४ हजार ६२३ हेक्टर असून, प्रत्यक्षात ६१ हजार २२४ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. याची टक्केवारी ८२.८० इतकी असून, हरभऱ्याला मिळणारे समाधानकारक दर आणि तुलनेने कमी खर्च हे त्यामागील प्रमुख कारण असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात येत आहे..गव्हाच्या पेरणीबाबतही समाधानकारक स्थिती असून, गव्हाचे सरासरी क्षेत्र ४१ हजार ५५५ हेक्टर आहे. यापैकी ३० हजार ६४२ हेक्टरवर गव्हाची पेरणी पूर्ण झाली असून, पेरणीची टक्केवारी ७३.७४ इतकी आहे. काही भागात सिंचनाच्या उपलब्धतेनुसार गव्हाची पेरणी अजूनही सुरू असल्याचे चित्र आहे. याशिवाय जिल्ह्यात चिया पिकाची ४६०९ हेक्टरवर लागवड करण्यात आली असून, मसूर पिकाची १९ हेक्टरवर तर करडई पिकाची ८१७ हेक्टरपैकी ५७७ हेक्टरवर पेरणी झाली आहे. करडईची पेरणी टक्केवारी ७०.६१ इतकी नोंदविण्यात आली आहे..Rabi Sowing: पुणे विभागात रब्बी हंगामातील पेरणी ७८ टक्क्यांवर पोहोचली.कृषी विभागाच्या माहितीनुसार, आगामी काही दिवसांत उर्वरित क्षेत्रावरही रब्बी पेरणी पूर्ण होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी प्रमाणित बियाणे, संतुलित खत व्यवस्थापन आणि कीड-रोग नियंत्रणाकडे लक्ष देण्याचे आवाहन कृषी तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे. सध्याच्या अनुकूल हवामानामुळे यंदाचा रब्बी हंगाम उत्पादनाच्या दृष्टीने समाधानकारक ठरेल..पीक क्षेत्र पेरणी टक्केवारीगहू ४१५५५ ३०६४२ ७३.७४हरभरा ७४६२३ ६१२२४ ८२.८०चिया ४६०९मसूर १९करडई ८१७ ५७७ ७०.६१.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.