Hasan Mushrif- Samarjeetsinh Ghatge Alliance Wins Kagal Nagar Parishad Election: कोल्हापूर जिल्ह्याचे राजकीय विद्यापीठ म्हणून समजल्या जाणाऱ्या कागलमध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि शाहू समुहाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या युतीने २३ पैकी २३ जागा जिंकल्या. कागल नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सविता प्रताप माने १४,७८९ मताधिक्याने विजयी झाल्या आहेत. या निवडणुकीच्या तोंडावर मुश्रीफ आणि घाटगे या कट्टर विरोधकांनी एकत्र येत युतीची घोषणा केली होती. दरम्यान, या युतीला मुरगूडमध्ये मोठा धक्का बसला. येथे शिवसेना शिंदेंच्या संजय मंडलिक गटाने यश मिळवले..कागलच्या जनतेचे आभार- मुश्रीफकागलमधील यशानंतर मुश्रीफ आणि घाटगे यांनी एकत्र पत्रकार परिषद घेत, जनतेचे आभार मानले. ''आमच्या मनात शंका होती की युती लोकांना रुचेल की नाही?. कागलमध्ये अनेक वर्षे राजकीय संघर्ष राहिला. अशा परिस्थितीत लोकांसमोर जाणे फार मोठे आव्हान होते. पण जनतेने आम्हाला स्वीकारले. त्याबद्दल कागलच्या जनतेचे आभार. कागलचा चांगला विकास करण्यासाठी आमची युती झाली. ही युती एवढ्यापुरती नाही. तर येणाऱ्या निवडणुकीत भक्कम आघाडी करु,'' असा विश्वास मुश्रीफ यांनी व्यक्त केला..Maharashtra Local Body Election Results 2025: भाजप सुसाट! मुश्रीफांसह अनेक दिग्गजांना मोठा धक्का, जाणून घ्या कोण, कुठे विजयी?.समरजितसिंह घाटगे म्हणाले की, युती झाल्यानंतर अनेक लोकांना आर्श्चय वाटलं. आम्ही दोघे एकत्र आल्यानंतर जनतेचा उठाव होईल. पण हा विषय आता संपलेला आहे. जनतेने कौल दिला आहे. कागलच्या जनतेचे आभार मानतो. मुरगूडच्या जनतेचा कौल आम्ही मान्य करतो..Maharashtra Nagar Parishad Nagar Panchayat Elections Result: राज्यातील २८८ नगरपरिषदा, नगरपंचायतींचा आज फैसला.कोल्हापूर जिल्हा - नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025कागल नगरपरिषद एकूण जागा – प्रभाग 11 – जागा 23विजयी उमेदवाराचे नाव- पक्षाचे नाव- (मताधिक्य) याप्रमाणेनगराध्यक्ष –सविता प्रताप माने– राष्ट्रवादी काँग्रेस(14789)प्रभाग 1अ –सुशांत सुभाष काळेकर - श्री छत्रपती शाहू आघाडी– (1014)ब –मेघा गजानन माने- श्री छत्रपती शाहू आघाडी– (1113)प्रभाग 2अ – अमित सदाशिव पिष्टे - राष्ट्रवादी काँग्रेस (1387)ब – साधना विष्णू पाटील - श्री छत्रपती शाहू आघाडी (1303)प्रभाग 3अ –प्रकाश अण्णासो गाडेकर- राष्ट्रवादी काँग्रेस (१९२९)ब –संगिता संतोष राजपूत - राष्ट्रवादी काँग्रेस (1490)प्रभाग 4अ – अरुण अशोक गुरव - श्री छत्रपती शाहू आघाडी (1285)ब –सुवर्णकुमार पिष्टे - राष्ट्रवादी काँग्रेस (1460)प्रभाग 5अ – जयवंत कृष्णराव रावण - श्री छत्रपती शाहू आघाडी (1317)ब – सुमन चंद्रकांत गवळी - राष्ट्रवादी काँग्रेस (1657)प्रभाग 6अ –अर्जुन बाबासो नाईक - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (1752)ब –स्वरूपा सनी जकाते - राष्ट्रवादी काँग्रेस (1678)प्रभाग 7अ –सतीश मुकुंद घाडगे - राष्ट्रवादी काँग्रेस (1832)ब –सारिका स्वप्नील बरड - श्री छत्रपती शाहू आघाडी (1777)प्रभाग 8अ –बाळासो गणपती माळी - श्री छत्रपती शाहू आघाडी (1389)ब –रझिया अस्लम मुजावर - राष्ट्रवादी काँग्रेस (1247)प्रभाग 9अ – प्रवीण पांडुरंग कलबार - राष्ट्रवादी काँग्रेस (2246)ब –सहरनिदा नवाज मुश्रीफ - राष्ट्रवादी काँग्रेस- बिनविरोधप्रभाग 10अ – दीपक कुंडलिक मगर - श्री छत्रपती शाहू आघाडी (1482)ब –पूनम शिवाजी मोरे - राष्ट्रवादी काँग्रेस (1514)प्रभाग 11अ – उमेश आनंदा सावंत - श्री छत्रपती शाहू आघाडी (1415)ब –रंजना दिलीप संगर - राष्ट्रवादी काँग्रेस (1499)क –मिना विलास लोटे - राष्ट्रवादी काँग्रेस (1506).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.