Malnutrition Issue : ठाणे जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांना कुपोषणमुक्तीसाठी धडे

Malnutrition Issue in Thane : ठाणे जिल्ह्यात तीव्र आणि मध्यम कुपोषित बालकांचे प्रमाण हजारोंच्या घरात आहे. हीच बाब लक्षात घेऊन, ठाणे जिल्हा परिषदेने कुपोषणमुक्तीसाठी कंबर कसली आहे.
Malnutrition
MalnutritionAgrowon
Published on
Updated on

Thane News : ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विकासकामे होत आहेत; मात्र तरीही बालकांच्या कुपोषणाचा विळखा अजूनही सैल झालेला नाही. आजही जिल्ह्यात तीव्र आणि मध्यम कुपोषित बालकांचे प्रमाण हजारोंच्या घरात आहे. हीच बाब लक्षात घेऊन, ठाणे जिल्हा परिषदेने कुपोषणमुक्तीसाठी कंबर कसली आहे.

यासाठी ५० मास्टर ट्रेनरची फळी उभी करण्याचा निर्णय घेतला असून यासाठी आयआयटी- मुंबई यांची मदत घेण्यात येणार आहे. आयआयटीच्या माध्यमातून आशा, अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, वैद्यकीय अधिकारी यांना कुपोषणमुक्तीचे सर्वप्रथम धडे देण्यात येणार आहेत. तसेच या परीक्षेत अव्वल आलेल्यांपैकी प्रत्येक तालुक्यासाठी १० जणांची मास्टर ट्रेनर म्हणून निवड करण्यात येणार आहे.

Malnutrition
Malnutrition : जळगावात कुपोषणाची समस्या होतेय कमी

पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भाग हा आदिवासीबहुल भाग म्हणून आजही ओळखला जातो. ग्रामीण दुर्गम भागातील बहुतांश नागरिक हे मजुरीचे काम करतात. तसेच मजुरीच्या कामासाठी स्थलांतरित होत असतात. परिणामी त्यांचे त्यांच्या बालकांकडे दुर्लक्ष होते. तसेच आहारातील उष्मांक आणि प्रथिनांच्या कमतरतेमुळे स्त्रियांमध्ये कमी वजनाची बालके जन्माला येत असतात.

त्यामुळे गर्भारपणात महिलांना पोषक आहार मिळणेदेखील गरजेचे असते; मात्र त्या मातांनादेखील पुरेसा पोषण आहार मिळत नसल्याने अनेकदा कमी वजनाची बालके जन्माला येत असतात. बालक जन्मानंतर पहिले तीन महिने ते पूर्णपणे मातेवर अवलंबून असल्यामुळे या कालावधीत मातेचे आरोग्य व पोषण चांगले राहणे आवश्यक आहे.

Malnutrition
Malnutrition : कुपोषणाच्या विळख्यात अडकली १११७ बालके

त्या काळात त्या मातेला पोषक व पुरेसा आहार न मिळाल्याने त्याचा परिणाम बालकावर होतो अन् ते बालक कुपोषणाच्या विळख्यात अडकते. एकीकडे ठाणे जिल्हा परिषद प्रशासनाकडून ग्रामीण भागातील कुपोषणाचे प्रमाण रोखण्यासाठी तीव्र कुपोषित बालकांची प्रतिदिन तपासणी करण्यात येत आहे.

ठाणे जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये निवडण्यात येणाऱ्या ५० मास्टर ट्रेनरच्या माध्यामातून इतर अशा वर्कर, अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच घरोघरी भेटीत स्तनदा व गरोदर मातांना आपला परिसर स्वच्छ असावा, आरोग्य, पोषण, स्तनपान याची माहिती देणार आहेत. त्यामुळे बाळाचे वजन वाढण्यास, बाळ सदृढ होऊन कुपोषणाचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे. यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांच्या मार्गदर्शनाखाली आयआयटी मुंबई यांची मदत घेणार आहे.
संजय बागुल, महिला व बाल विकास अधिकारी, जिल्हा परिषद, ठाणे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com