Anganwadi Workers : सव्वातीन हजारांवर अंगणवाडी कर्मचाऱ्यांना नोटिसा

Anganwadi Workers Strike : विविध प्रलंबित मागण्यांसाठी अंगणवाडीसेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी कर्मचारी बेमुदत संपावर आहेत.
Anganwadi Workers
Anganwadi Workers Agrowon
Published on
Updated on

Dhule News : विविध प्रलंबित मागण्यांसाठी अंगणवाडीसेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी कर्मचारी बेमुदत संपावर आहेत. धुळे जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांचाही यात सहभाग आहे. या संपामुळे बालकांना नियमित आहार वाटपासह त्यांच्या आरोग्यावर परिणाम झाल्याचे चित्र आहे.

दरम्यान, तीन हजार ५६८ पैकी २२७ सेविका, मदतनीस कामावर हजर झाले आहेत. उर्वरित तीन हजार ३४१ कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्याबाबत नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

धुळे जिल्ह्यात दहा प्रकल्पांतर्गत एकूण १ हजार ८१७ अंगणवाड्या आहेत. यात २०७ मिनी अंगणवाड्यांचा समावेश आहे. या अंगणवाड्यांतील एक हजार ६५७ पैकी एक हजार ५३४ अंगणवाडी सेविका, एक हजार ७१३ पैकी एक हजार ५२६ मदतनीस तसेच २०६ पैकी १८७ मिनी अंगणवाडी सेविकांचा या संपात सहभाग आहे.

जिल्ह्यात अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या दोन संघटना आहेत. त्यापैकी एका संघटनेने ४ डिसेंबर २०२३ पासून तर दुसऱ्या संघटनेने ७ डिसेंबर पासून बेमुदत संप पुकारला आहे.

Anganwadi Workers
Anganwadi Sevika Salary : अंगणवाडी सेविका मानधनावरून महाजन-ठाकूर यांच्यात खडाजंगी

पोषण आहाराचा प्रश्‍न

कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपामुळे अंगणवाडीतील बालकांचा पोषण आहाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, संपकाळातही पोषण आहारापासून लाभार्थी वंचित राहू नये, यासाठी प्रशासनाकडून अंगणवाडी केंद्रातील लाभार्थ्यांचे पालक, महिला मंडळ, बचत गट तसेच सामाजिक संस्थांमार्फत पोषण आहाराचे वाटप करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. कर्मचारी कामावर हजर न झाल्यास त्यांच्यावर कारवाईचा बडगा उचलण्यात येणार आहे.

Anganwadi Workers
Anganwadi Sevika : अंगणवाडी सेविकांचे विविध मागण्यांसाठी मुंबईत आंदोलन

या मागण्यांसाठी संप

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा द्यावा, सर्वोच्च न्यायालयाने ग्रॅच्युइटीबाबत दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करावी, निवृत्तिवेतन, ग्रॅच्युइटी द्यावी, दरमहा १८ ते २५ हजार रुपये मानधन द्यावे, अंगणवाडी केंद्राच्या कामासाठी नवीन अद्ययावत मोबाईल शासनाने पुरवावेत, मिनी अंगणवाडी केंद्राचे केंद्र सरकारच्या आदेशानुसार नियमित अंगणवाडी केंद्रात रूपांतर करण्यात यावे,

सेवा समाप्तीनंतर पेन्शनचा प्रस्ताव मंजूर करावा, रिक्त जागेवर दहावी उत्तीर्ण मदतनिसांना अंगणवाडी सेविका म्हणून नियुक्ती द्यावी, पदे भरताना शिक्षण व वयाची अट करण्यात यावी, नागरी प्रकल्पातील अंगणवाडी केंद्रांना सुधारित घरभाडे लागू करून थकबाकी द्यावी, निवृत्त कर्मचाऱ्यांना एकरकमी लाभ द्यावा आदी विविध मागण्यांचा यात समावेश आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com