Sugarcane Cutting Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Cutting : सिंधुदुर्गातील ५८ हजार टन उसाची तोडणी पूर्ण

Sugarcane Update : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ११६० हेक्टरवरील उसाची तोडणी पूर्ण झाली असून सिंधुदुर्गातून ५८ हजार टन ऊस उत्पादित झाला आहे.

Team Agrowon

Sindhudurg News : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ११६० हेक्टरवरील उसाची तोडणी पूर्ण झाली असून सिंधुदुर्गातून ५८ हजार टन ऊस उत्पादित झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत दहा हजार टन उत्पादन वाढले आहे. मागील तीन-चार वर्षांच्या तुलनेत यावर्षी वेळेत ऊसतोडणी मुळे ऊस उत्पादकांत समाधानाचे वातावरण आहे.

जिल्ह्यातील ९० टक्के ऊस हा असळज (ता. गगनबावडा, जि. कोल्हापूर) येथील डॉ. डी. वाय. पाटील साखर कारखान्यावर गाळप होतो. या कारखान्याचे सिंधुदुर्गातील वैभववाडी आणि कणकवली हे दोन तालुके कार्यक्षेत्र असले तरी उर्वरित जिल्ह्यातील ऊसदेखील कारखाना गाळपाकरिता घेतो.

या कारखान्यामुळे कोकणात ऊसलागवड सुरू झाली. मात्र पाच-सहा वर्षांपासून ऊसतोडणीच्या समस्येमुळे शेतकऱ्यांचा ऊस लागवडीकडील कल कमी झाला. त्यामुळे सिंधुदुर्गातील उसाचे क्षेत्र १७०० हेक्टरवरून आता ११६० हेक्टरपर्यंत घटले आहे. दरम्यान यावर्षी ऊस वाहतूक होत असलेल्या करूळ घाट काँक्रिटीकरणाचे काम सुरू करण्यात आल्यामुळे ऊस वाहतूक भुईबावडा घाटमार्गे वळविण्यात आली होती.

या वर्षीचा गाळप हंगाम ५ नोव्हेंबरपासून सुरू झाला. कारखाना प्रशासनाने जिल्हयातील ऊसतोडणीकडे सुरुवातीपासून लक्ष केंद्रीत केले. त्यामुळे पहिल्या महिना-दीड महिन्यातच ४० टक्के ऊसतोडणी पूर्ण झाली होती. त्यानंतर देखील ऊस तोडणीची गती कायम ठेवल्यामुळे जिल्ह्यातील ११६० हेक्टरवरील उसाची तोडणी वेळेत पूर्ण झाली. जिल्ह्यातून यावर्षी ५८ हजार टन ऊस उत्पादित झाला आहे. गेल्यावर्षी ४८ हजार टन ऊस उत्पादित झाला होता.

सिंधुदुर्गातील ऊसतोडणी पूर्ण झाली असून ५८ हजार टन ऊस जिल्ह्यातून उत्पादित झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत दहा हजार टन ऊस उत्पादन वाढले आहे. यावर्षी कारखान्याने प्रतिटन ३२०० रुपये दर दिला आहे.
बी. जी. शेळके, पर्यवेक्षक, डॉ. डी. वाय. पाटील साखर कारखाना

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT