Sugarcane Cutting : पाणीटंचाईच्या भीतीने ऊस तोडण्याची धडपड

Sugarcane Production : सातारा जिल्ह्यात एकूण ५५ लाख ४ हजार ९८० टन उसाच्या गाळपाद्वारे ५२ लाख ६९ हजार २८५ क्विंटल साखर निर्मिती झाली आहे.
Sugarcane
SugarcaneAgrowon

Satara News : ऊस गाळपाला गती आली असून गाळप हंगाम मध्यावर आला आहे. जिल्ह्यात एकूण ५५ लाख ४ हजार ९८० टन उसाच्या गाळपाद्वारे ५२ लाख ६९ हजार २८५ क्विंटल साखर निर्मिती झाली आहे. साखर उताऱ्यात सुधारणा होऊ लागली आहे. जिल्ह्यात सध्या सरासरी ९.७५ टक्के उतारा मिळत असून सहकारी कारखान्यांची साखर उताऱ्यात आघाडी आहे.

जिल्ह्यात सध्या १६ कारखान्यांकडून उसाचे गाळप सुरू आहे. यामध्ये दहा सहकारी, तर सहा खासगी कारखान्यांचा समावेश आहे. जिल्ह्यात बहुतांश कारखान्यांनी ३००० ते ३१५० रुपये या दरम्यान दर जाहीर केला आहे. जिल्ह्यातील १६ कारखान्यांनी जिल्ह्यात एकूण ५५ लाख ४ हजार ९८० टन उसाच्या गाळपद्वारे ५२ लाख ६९ हजार २८५ क्विंटल साखर निर्मिती केली आहे.

Sugarcane
Sugarcane Rate : उत्तर प्रदेश सरकारकडून ऊस दरात प्रति क्विंटल २० रुपयांची वाढ

सहकारी कारखान्यांचा साखर उतारा खासगी कारखान्यांच्या तुलनेत जास्त येत आहे. सहकारी कारखान्यांचा सरासरी १०.७१ टक्के तर खासगी कारखान्यांचा ८.४ टक्के साखर उतारा मिळत आहे.

Sugarcane
Sugarcane Cultivation : शहादा तालुक्यात ऊस लागवड स्थिर

गाळपात मात्र संख्येने कमी असतानाही खासगी कारखाने सहकारी कारखान्यांच्या बरोबरीने सुरू आहेत. सहकारी कारखान्यांनी २७ लाख ९४ हजार ५३४ टन गाळपाद्वारे २९ लाख ९२ हजार ९१० क्विंटल साखर निर्मिती केली आहे. तर खासगी कारखान्यांनी २७ लाख १० हजार ४४६ टन गाळपाद्वारे २२ लाख ७६ हजार ३७५ क्विंटल साखर निर्मिती केली आहे.

ऊसतोड मजुरांकडून पैसे घेणे सुरूच

ऊसतोड मजुरांकडून ऊस तोडणीस पैसे न घेण्यासाठी कितीही निर्बंध घातले तरी गुपचूप पैसे घेणे सुरूच आहे. पाणी टंचाईचे संकट गंभीर होत असल्याने ऊस लवकरात लवकर तुटावा, यासाठी शेतकऱ्यांकडून प्रयत्न केले जात आहेत. जिल्ह्यात उसाचे क्षेत्र कमी असून जिल्ह्याबाहेरील कारखान्यांकडून ऊस नेला जात आहे. यामुळे कारखान्यांनी ठरविलेल्या उद्दिष्टास ऊस कमी पडणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com