Sugarcane Season 2024 : यंदाच्या गाळप हंगामात कोल्हापुरची सरशी ; विभागवार साखर उत्पादनाची आकडेवारी

Sugar Production : राज्यातील यंदाचा ऊस गाळप हंगाम शेवटच्या टप्प्यात आला आहे. सद्यस्थितीत राज्यातील १२० कारखान्यांचे गाळप संपले आहे.
Sugarcane Season
Sugarcane Season Agrowon

Pune News : राज्यातील यंदाचा ऊस गाळप हंगाम शेवटच्या टप्प्यात आला आहे. सद्यस्थितीत राज्यातील १२० कारखान्यांचे गाळप संपले आहे. २७ मार्च अखेर राज्यातील साखर कारखान्यांनी १०३७ लाख ८९ हजार टन उसाचे गाळप केले असून १०५९ लाख २२ हजार क्विंटल साखर उत्पादित केली आहे.

चालू ऊस गाळप हंगामात राज्यातील एकूण २०७ साखर कारखान्यांनी सहभाग घेतला. यामध्ये १०३ सहकारी आणि १०४ खासगी कारख्यान्यांचा समावेश होता. त्यापैकी १२० कारखान्यांचा गाळप हंगाम संपला असून ते बंद झाले आहेत. मागील वर्षी याच कालावधीत ९.९८ टक्के सरासरी उताऱ्यानुसार, १०४७ लाख ९१ इतकी साखर उत्पादित झाली होती. तर, यंदाच्या १२० कारखान्यांच्या तुलनेत १८८ कारखान्यांचे गाळप पूर्ण झाले होते.

Sugarcane Season
Sugarcane Season : पुणे जिल्ह्यातील चार कारखाने बंद

यंदाच्या हंगामात सर्वच पातळीवर कोल्हापूर विभागाने आघाडी घेतली आहे. गाळपासह साखर उत्पादन आणि साखर उताऱ्यात कोल्हापूर विभाग अव्वल स्थानी राहिला आहे. कोल्हापूर पाठोपाठ पुणे विभाग यंदाच्या हंगामात दुसऱ्या क्रमांकावर राहिला आहे. मागील हंगामात याच कालावधीत (२७ मार्च) २११ कारखान्यांनी १०५० लाख २५ हजार टन उसाचे गाळप केले होते. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत यंदा ऊस गाळपाचा वेग कमी असल्याचे चित्र आहे.

१२० कारखान्यांचा पट्टा पडला

यंदाचा गाळप हंगाम शेवटच्या टप्प्यात आला असला तरी राज्यातील १२० कारखान्यांचे गाळप पूर्ण झाले असून हे कारखाने बंद झाले आहेत. कोल्हापूर विभागात २०, सोलापूर विभागात ३८, पुणे विभागात १६, अहमदनगर विभागात १३, छत्रपती संभाजी नगर विभागात १२ साखर कारखानदार, नांदेड विभागात १८ साखर कारखाने आणि अमरावती विभागात ३ साखर कारखाने बंद झाले आहेत.

Sugarcane Season
Sugarcane Season : सांगलीतील कारखान्यांचा हंगाम संपला

कोल्हापूर विभागाची आघाडी

यंदाच्या हंगामात ऊस गाळपासह, साखर उत्पादन आणि साखर उताऱ्यात कोल्हापूर विभागाने आघाडी घेतली आहे. कोल्हापूर विभागातील ४० कारखान्यांमध्ये यंदाच्या हंगामात २३७ लाख ३१ हजार टन ऊसाचे गाळप झाले . सरासरी ११.५३ टक्के उताऱ्यासह २७ मार्च अखेर २७३ लाख ५३ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामातही कोल्हापूर विभागाने आघाडी कायम राखली आहे.

साखर उत्पादन विभागवार

कोल्हापूर विभाग - २७३ लाख ५३ हजार क्विंटल

पुणे विभाग - २३८ लाख ६९ हजार क्विंटल

सोलापूर विभाग - १९८ लाख ०८ हजार क्विंटल

अहमदनगर विभाग - १३३ लाख २७ हजार क्विंटल

छत्रपती संभाजी नगर विभाग - ८५ लाख ५९ हजार क्विंटल

नांदेड विभाग - ११८ लाख ७७ हजार क्विंटल

अमरावती विभाग - ९ लाख ०७ हजार क्विंटल

नागपूर विभाग - २ लाख २२ हजार क्विंटल

साखर उतारा विभागवार

कोल्हापूर विभाग - ११.५३ टक्के

पुणे विभाग - १०.४४ टक्के

सोलापूर विभाग - ९.३७ टक्के

अहमदनगर विभाग - ९.९ टक्के

छत्रपती संभाजी नगर विभाग - ८.९ टक्के

अमरावती विभाग - ९.३४ टक्के

नागपूर विभाग - ५.८७ टक्के

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com