Sugarcane Harvesting : फड जाळूनच ऊसतोडणी; टोळ्यांची मनमानी

Sugarcane Update : सध्या ऊसतोडणी शेवटच्या टप्प्यात असून, कारखाना बंद होण्यापूर्वी ऊसतोडणी पूर्ण होणे आवश्यक आहे. यामुळे ऊसतोडणी कामगारांकडून मनमानी सुरू असून सर्रास फड जाळूनच तोडणी सुरू आहे.
Sugarcane
SugarcaneAgrowon

Solapur News : सध्या ऊसतोडणी शेवटच्या टप्प्यात असून, कारखाना बंद होण्यापूर्वी ऊसतोडणी पूर्ण होणे आवश्यक आहे. यामुळे ऊसतोडणी कामगारांकडून मनमानी सुरू असून सर्रास फड जाळूनच तोडणी सुरू आहे. यामुळे पर्यावरणासह शेतकऱ्यांचेही नुकसान होत आहे. शेतकऱ्यांना टनामागे २०० ते ३०० रुपयांचा दर कमी मिळत असून एका ट्रॅक्टरमागे टन ते दीड टन वजन कमी भरत आहे.

उत्तर भारतात गव्हाची रिकामे राने पेटविण्याची प्रथा होती. दिल्लीशेजारी अशी राने पेटविण्यास बंदी घालण्यासाठी न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागला होता. अशीच वेळी सोलापूर जिल्ह्यातही येते की काय अशी अवस्था सध्या झाली आहे. पूर्वी अत्यंत अपरिहार्य कारणाशिवाय कोणही उसाचे फड पेटवून तोडणी करत नव्हते.

Sugarcane
Sugarcane Farming : ‘पंदेकृवि’, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये सामंजस्य करार

मात्र, अलीकडे ऊसतोड कामगारांची मनमानी इतकी वाढली आहे की, प्रत्येक शेतकऱ्यांसह फड जाळूनच तोडणी करण्यास भाग पाडत आहेत. ऊस जाळल्यामुळे ऊसतोड कामगाराचे काम सोपे होते. गवत, पाचट जळून गेल्याने काम उरकते हा यामागील हेतू आहे. मात्र, यामध्ये उसाचे वजन घटून शेतकऱ्यांचेही नुकसान होत आहे.

Sugarcane
Sugarcane Farmers : साहेब जळालेल्या उसाचं चिपाड झालं आता तरी तोडा, शेतकऱ्यांची आर्त हाक

शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान

फड जाळण्याच्या पद्धतीमुळे शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान होत आहे. ऊस जाळल्यामुळे एका ट्रॅक्टरमागे एक ते दीड टन वजन कमी भरत आहे. दुसरीकडे साखर कारखान्यांकडून जाळलेल्या उसाला दोनशे ते तीनशे रुपयांचा दर कमी मिळत आहे. दुसरीकडे फड जाळला तरी टोळीकडून दक्षिणा कमी केली जात नाही. एकरी पाच हजार रुपये दक्षिणा व एका कोयत्याला दोन किलो चिकनची मागणी केली जात आहे.

फड जाळणे चुकीचे आहे. आशा वेळी शेतकऱ्यांनी त्वरित साखर कारखान्यांच्या कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. दुष्काळी स्थिती असल्याने खोडवा पिकासाठी पाचट राखणे आवश्यक आहे. कमी पाण्यात खोडवा पीक घेण्यासाठी कंपोस्ट तोयार होण्यासाठी पाचट राखणे आवश्यक आहे.
पांडुरंग साठे, उपप्रादेशिक साखर सहसंचालक, सोलापूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com