Adulteration Issue  Agrowon
ॲग्रो विशेष

Adulteration Issue : ‘अन्न, औषध’चा भेसळखोरांवर बडगा

Adulteration Update : सणासुदीचे दिवस असल्याने दूध व दुग्धजन्य पदार्थ तसेच इतर सर्व प्रकारच्या अन्नपदार्थामध्ये होणाऱ्या भेसळीला आळा बसावा यासाठी, अन्न व औषध प्रशासनाकडून १ सप्टेंबरपासून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.

Team Agrowon

Nashik News : सणासुदीचे दिवस असल्याने दूध व दुग्धजन्य पदार्थ तसेच इतर सर्व प्रकारच्या अन्नपदार्थामध्ये होणाऱ्या भेसळीला आळा बसावा यासाठी, अन्न व औषध प्रशासनाकडून १ सप्टेंबरपासून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. यामध्ये अनियमितता व विनापरवानगी आस्थापनांवर कारवाई करत आतापर्यंत साडेतेरा लाख रुपयांचा माल जप्त केल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त महेश चौधरी यांनी दिली.

सणासुदीच्या काळात विशेष मोहिमेअंतर्गत प्रशासनाच्या नाशिक कार्यालयाने जिल्हाभरात दुग्ध व दुग्धजन्य असे पनीर, तूप इत्यादी अन्न पदार्थाचे २२ अन्न नमुने विश्‍लेषणासाठी घेऊन भेसळीच्या संशयावरून ९९ हजार ५७० रुपये किमतीचा ५६३ किलो साठा जप्त केला आहे. मिठाई व नमकीन या अन्न पदार्थांचे एकूण ३२ अन्न नमुने विश्‍लेषणासाठी घेत भेसळीच्या संशयावरून २९९ किलो साठा जात केला.

त्याची किंमत ३१ हजार ३५० रुपये आहे. त्यात मैदा, बेसन, भगर इत्यादी अन्न पदार्थांचे एकूण १९ अन्न नमुने विश्‍लेषणासाठी घेऊन भेसळीच्या संशयावरून ८६ हजार ६०० रुपयांचा ८६६ किलोचा साठा जप्त केला आहे. खाद्यतेल आम पदार्थाचे १६ अन्न नमुने विश्‍लेषणासाठी घेत भेसळीच्या संशयावरून १०१२ किलो साठा जप्त केला. त्याची किंमत दोन लाख ९७ हजार ४४० रुपये आहे.

सणासुदीच्या काळात वापरण्यात येणारे इतर अन्न पदार्थांपैकी चहा, शीतपेय, मसाले इत्यादींचे १० अन्न नमुने विश्‍लेषणासाठी घेत भेसळीच्या संशयावरून १९२८ किलो साठा जप्त केला आहे. त्याची किंमत ८ लाख ७१ हजार ७३० रुपये आहे. सर्व अन्नपदार्थ नमुने विश्‍लेषणासाठी प्रयोगशाळेकडे पाठविले आहेत. अहवाल प्राप्त होताच अन्न सुरक्षा व मानके कायद्यातील तरतुदीप्रमाणे कारवाई होणार आहे.

भेसळीबाबत संपर्काचे आवाहन

प्रत्येक नागरिकास सुरक्षित व निर्भेळ अन्न उपलब्ध होण्यासाठी तसेच त्यात होणारी भेसळ रोखण्यासाठी प्रशासन दक्षता घेत आहे. ही मोहीम डिसेंबर २०२४ पर्यंत चालू राहणार आहे. तसेच अन्न पदार्थांबाबत काही तक्रार असल्यास नागरिक प्रशासनाच्या FoScos प्रणालीवरही ऑनलाइन तक्रार करू शकतात, असे चौधरी यांनी कळविले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT