Milk Adulteration : भेसळीच्या संशयावरून पनीर, मिठाईचा साठा जप्त

Dairy Product Adulteration : अन्न व औषध प्रशासनाने प्रतिबंधित अन्नपदार्थ विक्री बाबत कठोर धोरण स्वीकारले आहे.
Milk Adulteration
Milk AdulterationAgrowon

Nashik News : अन्न व औषध प्रशासनाने प्रतिबंधित अन्नपदार्थ विक्री बाबत कठोर धोरण स्वीकारले आहे. त्याचाच एक भाग म्हणून शहरात दोन ठिकाणी टाकलेल्या छाप्यात भेसळीच्या संशयावरून ५९ हजार ४५० रुपयांचा २२४ किलो पनीर व मिठाईचा साठा जप्त करून नष्ट करण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त (अन्न) संजय नारागुडे यांनी दिली आहे.

Milk Adulteration
Milk Adulteration : भेसळीचा संशय असलेले २२०० लिटर दूध नष्ट

अन्न व औषध प्रशासनास शहरात बनावट पनीर व भेसळयुक्त पनीर विक्री होत असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार मे.जसपालसिंग प्रीतीपालसिंग कोहली (बळवंत प्लाझा जवळ, देवळाली कॅम्प) यांच्या पेढीची तपासणी केली असता अस्वच्छ वातावरणात पनीरचा साठा साठविल्याचे निदर्शनास आले.

तसेच ही पेढी विनापरवाना पनीर उत्पादन करीत असल्याचे आढळले.पनीर भेसळीच्या संशयावरून अन्न नमुना विश्लेषणासाठी घेऊन उर्वरित ३७ हजार ७३० किंमतीचा १७१०५ किलो पनीरचा साठा जप्त करण्यात आला.

Milk Adulteration
Paneer Adulterated : पनीरमधील भेसळ कशी ओळखाल? 'या' ठिकाणी करा तक्रार

त्याचप्रमाणे मे.प्रशांत कोंडीराम यादव (देवळाली कॅम्प,नाशिक) या मिष्टान्न उत्पादक पेढीचीही तपासणी केली असता या पेढीत विनापरवाना अत्यंत अस्वच्छ वातावरणात पेढा, अंजीर बर्फी इत्यादी मिठाईचा साठा साठविल्याचे आढळले आहे. भेसळीच्या संशयावरून या पेढीतील अन्न नमुना विश्लेषणासाठी घेऊन उर्वरित २१ हजार ७२० किंमतीचा ५३ किलो साठा जप्त करण्यात आला.

व्यावसायिकांनी अन्नपदार्थात भेसळ करू नये

अन्न व्यावसायिकांनी अन्न पदार्थात भेसळ करू नये.तसे करतांना आढळल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. अन्न व औषध दर्जा बाबतीत संशय असल्यास नागरिकांनी प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांक 1800222365 वर संपर्क साधावा. असे आवाहन नारागुडे यांनी केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com