New Delhi News: भारत दौऱ्यावर आलेले रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादीमिर पुतीन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शुक्रवारी (ता. ५) शिखर बैठक झाली. यात उभय देशांमध्ये व्यापार, गुंतवणूक आणि गतिशीलता वाढविण्यासाठीच्या ‘व्हिजन २०३० आर्थिक सहकार्य’ करारावर शिक्कामोर्तब करण्यात आले..या वेळी पंतप्रधान मोदींनी भारत-रशिया मैत्री ध्रुवताऱ्यासारखी असल्याचे प्रतिपादन केले आणि रशिया-युक्रेन संघर्षावर पुन्हा एकदा शांततेचे आवाहन केले. तर राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी दोन्ही देशांच्या दृढ संबंधांची ग्वाही देताना भारताच्या विकासासाठी आवश्यक तेल, नैसर्गिक वायूसह सर्व प्रकारच्या ऊर्जा स्रोतांची पूर्तता करण्यासाठी रशियाच्या मदतीची तयारी दर्शविली..PM Modi: एका हंगामात एक एकर जमिनीत नैसर्गिक शेती करुन पाहा, पंतप्रधान मोदींचे शेतकऱ्यांना आवाहन.राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचे २३व्या भारत-रशिया द्विपक्षीय शिखर परिषदेसाठी गुरुवारी (ता. ४) सायंकाळी भारतात आगमन झाले होते. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी सर्व शिष्टाचार बाजूला ठेवून विमानतळावर स्वागतासाठी उपस्थित राहून भारत-रशिया मैत्रीचा संदेश दिला होता. शुक्रवारी सकाळी राष्ट्रपती भवनात राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचा स्वागत समारंभ झाला..पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांचे स्वागत केले. राष्ट्राध्यक्ष पुतीन यांना त्यानंतर तिन्ही सैन्यदलांच्या तुकड्यांनी मानवंदना (गार्ड ऑफ ऑनर) दिली. त्यानंतर दोन्ही नेत्यांची हैदराबाद हाऊस येथे शिखर बैठक झाली. दोन तासांहून अधिक काळ चाललेल्या या बैठकीनंतर भारत आणि रशियामध्ये २०३० पर्यंत आर्थिक सहकार्य करारावर स्वाक्षरी झाली.PM Modi: मुंबई हल्ल्यानंतर प्रत्युत्तर देण्यास कुणी रोखले: मोदी.कुडनकुलमला दिले इंधनरशियातील ‘रोसॲटम’ या सरकारी कंपनीने तमिळनाडूतील कुडनकुलम येथील तिसऱ्या अणुभट्टीला आज आण्विक इंधनाची पहिली खेप दिली. रशियाचे अध्यक्ष व्लादीमिर पुतीन हे भारत दौऱ्यावर असतानाच हा इंधन पुरवठा झाला आहे. भारतातील या अणुभट्टीला एकूण सात खेपांद्वारे आण्विक इंधन पुरविले जाणार आहे. याबाबतचा करार २०२४ मध्ये झाला होता..महात्मा गांधींच्या समाधीचे पुतीन यांनी घेतले दर्शनभारत दौऱ्यावर आलेले रशियाचे अध्यक्ष व्लादीमिर पुतीन यांनी शुक्रवारी (ता. ५) सकाळी राजघाट येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या समाधीचे दर्शन घेत आदरांजली वाहिली. ‘‘आधुनिक भारताच्या संस्थापकांपैकी एक असलेले महात्मा गांधी हे थोर विचारवंत आणि मानवतावादी होते. त्यांनी जगभरात शांततेसाठी मोठे योगदान दिले असून स्वातंत्र्य आणि मूल्यांबाबतचे त्यांचे विचार आजही सयुक्तिक आहेत,’’ असे मत पुतीन यांनी राजघाटावरील नोंदवहीत नोंदवले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.