Adulterated Ghee : अमरावतीत दूध डेअरीतून ४५० किलो भेसळयुक्त तूप जप्त

Food Adulteration : सणासुदीच्या दिवसांत शुद्ध तुपात भेसळ होत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली.
Adulterated Ghee : अमरावतीत दूध डेअरीतून ४५० किलो भेसळयुक्त तूप जप्त
Published on
Updated on

Amaravati News : सणासुदीच्या दिवसांत शुद्ध तुपात भेसळ होत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली. अन्न व औषध प्रशासनाने साडेचारशे किलो साठा जप्त केला.

अन्न-सुरक्षा अधिकारी व जिल्हा दूध भेसळ समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मुदलीयारनगर येथील सागर दूध डेअरीवर छापा टाकून जवळपास १ लाख ८० हजार रुपयांचा ४५० किलो माल जप्त केला.

Adulterated Ghee : अमरावतीत दूध डेअरीतून ४५० किलो भेसळयुक्त तूप जप्त
Milk Adulteration : दूध भेसळीवर नियंत्रण कधी?

तुपात भेसळ करून त्याची सर्रास विक्री होत असल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर ही कारवाई केली. असे अन्न व सुरक्षा अधिकारी गजानन गोरे यांनी सांगितले. सणासुदीच्या दिवसांमध्ये तुपाचा वापर घरोघरी मोठ्या प्रमाणात केला जातो.

खऱ्या तुपात वनस्पती तुपाची भेसळ सहज करतो येते. त्यामुळे हे भेसळयुक्त तूप अनेक दूध डेअरीमध्ये विक्रीकरिता ठेवल्या जाते. विना लेबल येथे साठा आढळला.

Adulterated Ghee : अमरावतीत दूध डेअरीतून ४५० किलो भेसळयुक्त तूप जप्त
Food Adulteration : मिठाईमध्ये बनावट खव्याचा वापर

मुदलीयारनगर येथील सागर दूध डेअरीमध्ये केलेल्या कारवाईत जिल्हा दूध भेसळ समितीचे अध्यक्ष अपर जिल्हाधिकारी सूरज वाघमारे, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त भाऊराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनात अन्न-सुरक्षा अधिकारी गजानन गोरे, संदीप सूर्यवंशी, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. तुषार गावंडे व दूधशाळा व्यवस्थापक विनोद पाठक यांच्या पथकाने ही कार्यवाही केली.

शुद्ध तूप ८०० ते ९०० रुपये किलो

शुद्ध तूप ८०० ते ९०० रुपये प्रतिकिलो याप्रमाणे बाजारात उपलब्ध आहे. तर वनस्पती तूप पॅकेटप्रमाणे घेतल्यास १४० ते १५० रुपये किलो तर खुले घेतल्यास ११० ते १२० रुपये प्रतिकिलो या भावात मिळते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com