Ahilyanagar News: अहिल्यानगर जिल्ह्यातील वेगवेगळ्या बाजारात शेवग्याच्या शेंगांना प्रति क्विटंल पंधरा हजारांपासून ४० हजार रुपयांपर्यंत उच्चांकी घाऊक दर काही दिवसांपासून मिळत आहे. ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यांत झालेला सततचा पाऊस, अतिवृष्टीचा फटका यामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे सध्या बाजारात मागणीनुसार पुरवठा होत नाही. परिणामी, मिळणाऱ्या चांगल्या दरामुळे शेवगा उत्पादक शेतकरी समाधानी आहेत..अहिल्यानगर बाजारात दररोज ६० ते ८० क्विंटलपर्यंत सरासरी आवक होत होती. दोन महिन्यांपासून आवकेत घट होत गेली. गेल्या पंधरा दिवसांपासून तर दररोज पाच क्विंटलच्या आतच आवक होत आहे. साधारण एक महिन्यापासून दरात वाढ होत गेली. शेवग्याच्या शेंगांना मागणी असूनही आवक, पुरवठा होत नसल्याने गुरुवारी (ता. ५) अवघी १ क्विंटलची आवक झाली आणि घाऊक बाजारात प्रति क्विंटलला १५ हजार ते ४० हजार व सरासरी २७ हजार ५०० रुपये असा उच्चांकी दर मिळाला आहे..Agrowon Podcast: तुरीचा भाव दबावातच; हरभरा दर स्थिर, मटारच्या दरात नरमाई, हिरव्या मिरचीचे दर टिकून तर बोरांना मागणी.यापूर्वी २९ नोव्हेंबरलाही शेवग्याला ४० हजार रुपये क्विंटलपर्यंत दर मिळाला आहे. ठोक दरातच शेवगा चारशे रुपये किलो असल्याने किरकोळ विक्रीतून बहुतांश ठिकाणी शेवगा गायब झाल्याचे पाहायला मिळत आहे. जेथे मिळतो तेथे पाचशे रुपये किलोपेक्षा अधिक दर सांगितला जात आहे. यामुळे व्यापारी आणि शेतकरी दोघांनीही या पिकाकडे लक्ष वेधले आहे..हॉटेल व उपाहारगृहांमध्ये सांबरमध्ये शेवग्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र आता शेवग्याच्या दरात तेजी आली आहे. त्यामुळे काही हॉटेल अन् उपाहारगृह चालकांनी सांबरमधून शेवगा हद्दपार केला आहे. त्या ऐवजी हॉटेलचालकांनी डांगर अन् भोपळ्याचा वापर सुरू केला आहे..Cotton Price: खेडा खरेदीत कापसाचे दर हमीभावापेक्षा कमीच.त्यामुळे डांगर अन् भोपळ्याच्या भावात वाढ झाल्याचे सांगितले जात आहे. राज्यातील विविध भागात सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यांत झालेल्या सततच्या पावसाने शेवग्याची झाडे वाया गेली. जमिनी चिभडल्याने अनेक भागांत झाडांचे नुकसान झाले. त्यामुळे झाडे काढावी लागली. आता नवीन झाडे फुटली असली तरी त्याला शेंगा यायला अजून अवधी आहे..शेवग्याला दीड महिन्यातमिळालेला दर (प्रति क्विंटल)१० ऑक्टोबर ५ हजार ते १० हजार१६ ऑक्टोबर ४ हजार ते ९ हजार२१ ऑक्टोबर ५ हजार ते ११ हजार३० ऑक्टोबर ४ हजार ते १० हजार१० नोव्हेंबर ५ हजार ते १० हजार१४ नोव्हेंबर ५ हजार ते १३ हजार२० नोव्हेंबर १० हजार ते २० हजार२९ नोव्हेंबर १५ हजार ते ४० हजार१ डिसेंबर २० हजार ते ३० हजार२ डिसेंबर २० हजार ते २५ हजार५ डिसेंबर १५ हजार ते ४० हजार.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.