Sweets
Sweets Agrowon

Food Adulteration : मिठाईमध्ये बनावट खव्याचा वापर

Use of Adulterated Khoya in Sweets Exposed : सणासुदीच्या दिवसांमध्ये मिठाई बनविण्यासाठी बनावट खव्याचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली.
Published on

Amaravati News : सणासुदीच्या दिवसांमध्ये मिठाई बनविण्यासाठी बनावट खव्याचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली. अन्न व औषध प्रशासन विभागाने केलेल्या थातूरमातूर कारवाईत दहा लाखांचा बनावट खवा जप्त करण्यात आला.

अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने जुन्या बायपास मार्गावरील एका गोदामावर छापा टाकून तपासणी केली. बनावट खव्याचा माल असलेले गोदाम दिनेश रामराव नागपुरे यांच्या मालकीचे आहे. जिल्हा दुग्ध विकास विभाग, अन्न औषध प्रशासन विभाग, पशुधन विकास अधिकारी यांच्या पथकाने मनकर्णानगर जुना बायपासवर ही कारवाई केली आहे.

Sweets
Khoya Production : खवानिर्मितीतून मिळाली रांजणीला ओळख

बनावट खव्याचा माल जप्त करून त्याचे नमुने तपासणीसाठी शासकीय प्रयोगशाळेमध्ये पाठविण्यात आले आहे. जप्त खवा हा दहा लाख रुपयांचा असल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे प्रभारी सहआयुक्त श्री. चव्हाण यांनी सांगितले. बनावट खव्याचा माल नेमका कुणाच्या मालकीचा आहे, यासंदर्भात माहिती देण्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी टाळले.

Sweets
Khoya Production : दुग्ध व्यवसायाला दिली खवा निर्मितीची जोड

कनार्टक राज्यातील माल

जुन्या बायपास मार्गावरील ज्या गोदामात दहा लाखांचा बनावट खव्याचा माल आढळला, तो कनार्टक राज्यामधून अमरावती शहरामध्ये आणल्या गेल्याचे कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

(ॲग्रो विशेष)

शहरासह जिल्ह्यात मालाची विक्री

गत अनेक वर्षांपासून बनावट खव्याची विक्री शहरात सुरू असताना व नागरिकांच्या जीवनाशी संबंधित विषय असतानाही अन्न व औषध प्रशासन विभागाने आतापर्यंत त्या विषयाला गांभीर्याने घेतले नाही. तयार खव्याचा वापर चोवीस तासांच्या आत होणे गरजेचे असते. त्यामुळे बनावट खव्याचा माल परप्रांतातून शहरात दाखल झाल्याचे दिसून येते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com