Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage : सततच्या पावसाने भाजीपाला पिकांना फटका

Heavy Rain Crop Loss : यंदा सतत पाऊस सुरु राहण्याने दानापूर परिसरात लागवड केलेल्या भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

Team Agrowon

Akola News : यंदा सतत पाऊस सुरु राहण्याने दानापूर परिसरात लागवड केलेल्या भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. बाजारपेठेत भाजीपाल्याला दर मिळत असताना शेतामध्ये माल नसल्याने शेतकरी चिंतातूर झालेले आहेत. अनेकांचा लागवडीवर केलेला खर्चही यंदा वसुल झालेला नाही.

तेल्हारा तालुक्यातील दानापूर परिसरात मोठ्या प्रमाणावर भाजीपाला पिकांची लागवड केली जाते. मात्र, सतत सुरू असलेल्या पावसामुळे येथील टोमॅटो, कारले कोबी, वांगी या पिकांचे अतोनात नुकसान झाले. टोमॅटो पिकावर करपा आल्याने अनेकांचे प्लॉट संपुष्टात आले.

सहा ते सात महिने चालणारा टोमॅटोचा प्लॉट अवघ्या दीड महिन्यात खराब झाल्याने पिकाला लागलेला खर्च सुद्धा निघू शकला नाही. दानापूरमध्ये टोमॅटोचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. शेतकरी हजारोंचा खर्च यासाठी करीत असतात.

टोमॅटोचे दर वाढले, मात्र माल नाही

बाजारपेठेत गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोचे दर वाढले आहेत. या आठवड्यात टोमॅटो प्रतिक्रेट (२० ते २२ किलो) हजार रुपयांवर विकतो आहे. दुसरीकडे टोमॅटोचे प्लॉट करपल्याने उद्धवस्त झाल्याने शेतकऱ्यांकडे माल नाही.

मी दोन एकरात टोमॅटोची लागवड केली होती. मात्र, सतत सुरू असलेल्या पावसामुळे टोमॅटो पिकावर करपा, नागअळीचा प्रादुर्भाव झाला. त्याचा मोठा फटका पिकाला बसला. आमचा लागलेला खर्च सुद्धा निघालेला नाही.
- सुरेश पिलात्रे, टोमॅटो उत्पादक, दानापूर, जि. अकोला
एकेकाळी दानापूर गावातून दररोज एक हजार ते पंधराशे क्रेट टोमॅटो अकोट बाजारात विक्रीला यायचे. मात्र, भाजीपाला पिकांवर कीड-रोगांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे फवारणीवरील खर्चात वाढ झाली. त्यामुळे शेतकऱ्यांचा भाजीपाला लागवडीकडील कल आता कमी झाला आहे. भाजीपाला उत्पादक शेतकरी तसेच त्यावर अवलंबून असलेले खरेदीदारही आता अडचणीत आले आहेत.
- सुभाष दामधर, भाजीपाला अडते, अकोट, जि. अकोला

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT