Crop Damage : शेतकऱ्यांवर आस्‍मानी संकट

Heavy Rain Paddy Crop Loss : जुलै महिन्यात अतिवृष्टीमुळे उरण तालुक्यातील दुबार भाताची लागवड करावी लागली. त्यानंतर पुन्हा ऑगस्टमध्ये झालेल्या पावसामुळे दुबार लावलेले भातही कुजून गेले.
Paddy
Paddy Agrowon
Published on
Updated on

Uran News : जुलै महिन्यात अतिवृष्टीमुळे उरण तालुक्यातील दुबार भाताची लागवड करावी लागली. त्यानंतर पुन्हा ऑगस्टमध्ये झालेल्या पावसामुळे दुबार लावलेले भातही कुजून गेले. त्यामुळे शेतकऱ्यांनी तिबार लावणी केली.

आस्मानी संकटांचा सामना करत सध्या भातपीक बहरले असतानाच गेल्या दोन दिवसांत झालेल्या परतीच्या मुसळधार पावसामुळे उभे पीक आडवे झाले आहे. काही दिवसांतच कापणीला आलेले पीक भिजल्यामुळे शेतकरी डबघाईला आला आहे.

Paddy
Paddy Crop Damage : रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने भात पिकाचे नुकसान

उरण, पनवेल तालुक्यात अहोरात्र पडणाऱ्या पावसामुळे परिसरातील भातशेती धोक्यात आली आहे. त्यामुळे प्रशासनाने तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. यंदाचे वर्ष पावसासाठी विक्रमी ठरले आहे. जूनच्या अखेरीस सुरू झालेला पाऊस शेवटपर्यंत पडतच आहे.

त्यामुळे उरण परिसरात भातशेतीचे मोठे नुकसान झाले. गेल्या तीन दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे हाती आलेले पीक वाया जात आहे. यावर्षी भातशेतीसाठी पूरक परिस्थिती नव्हती.

त्यात संततधार पावसामुळे भात लावणीचा काळ पाण्यात गेला. त्यानंतरही शेतकऱ्यांनी कसेबसे पीक जगवले. गेल्या दहा ते बारा दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे कापणीला आलेली उभी पिके आडवी झाली आहेत.

Paddy
Paddy Farming : रायगडमधील भातशेती बहरली

त्यामुळे यंदाच्या वर्षात भाताचे उत्पादन घटण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. अवकाळी पावसामुळे भातशेतीचे नुकसान पाहता, राज्य सरकारने तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणीही शेतकरी करत आहे.

दाणे कुजण्याची भीती

भातपिके आडवी पडली की ती परिपक्व न होता दाणा कुजून पोकळ राहण्याची स्थिती निर्माण झाली आहे. कापणीला आलेल्या दाण्यांना अंकुर फुटून मोठे नुकसान होण्याची शक्‍यता आहे. श्वेशिवाय आडवे पडलेले पीक कापताना शेतकऱ्यांना कसरत करावी लागते. शिवाय, भाताचा पेंढासुद्धा खराब होणार असून उन्हाळ्यात जनावरांना वैरण मिळणे कठीण होणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com