Chakan Bazar Committee Agrowon
ॲग्रो विशेष

Chakan Bazar Committee : चाकण बाजार समितीत हप्त्यासाठी गावगुंडाची दहशत; शेतकऱ्यांवर केली दगडफेक

Pune Crime News : चाकण बाजार समितीत हप्त्यासाठी गावगुंडाची दहशत माजल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे येथे दहशत निर्माण झाली असून गावगुंडाचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांसह अडत्यांनी केली आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : पुणे जिल्ह्यातील चाकण बाजार समितीत बुधवारी (ता.१२) गावगुंडानी दहशत माजवली. दगड, कठी, कोयत्यांनी दहशत माजवत गावगुंडानी शेतकरी व व्यापाऱ्यांना जबर मारहाण केली. त्यामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तर गावगुंडाचा बंदोबस्त करा, अन्यथा बाजार समिती बंद ठेवू असा इशारा शेतकऱ्यांसह अडत्यांनी दिला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, चाकण बाजार समितीत गावगुंडांनी दहशत माजवली. या गावगुंडांनी हप्त्याची मागणी करत बुधवारी मध्यरात्री बाजार समितीत धुमाकूळ घातला. शेतकऱ्यांसह आडत व्यापाऱ्यांना पाच ते सहा जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केली. ही झालेली मारहान सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

दरम्यान रात्री बाजार समिती परिसरात गावगुंडांनी शेतकऱ्यांसह अडते आणि व्यापऱ्यांना हप्त्यासाठी धमकावले होते. याची तक्रार चाकण पोलिसांमध्ये करण्यात आली होती. तर या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींना अटक केली होती. मात्र पहाटे त्यांना पोलिसांनी सोडून दिले

त्यानंतर आता गावगुंडांनी बाजार समिती परिसरात येऊन शेतकऱ्यांसह अडते आणि व्यापाऱ्यांना धमकावत राडा घातला. तर दगड, कठी, कोयत्यांनी दहशत माजवत मारहान केली आहे. या घटनेमुळे समिती परिसरात शेतकरी व व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

त्यामुळे आता चाकण बाजार समितीत शेतकऱ्यांसह आडते व व्यापाऱ्यांनी कठोर भूमिका घेत पोलिसांनी यावर आवर घालत गावगुंडाचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे. तसेच या गावगुंडाचा पोलिसांनी बंदोबस्त न केल्यास बाजार समिती बंद ठेवण्याचा इशारा शेतकऱ्यांसह आडते व व्यापाऱ्यांनी दिला आहे. अधिक तपास चाकण पोलीस करत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT