Chakan Market : चाकण बाजारात गुजरातची मिरची

चाकण (ता. खेड) येथील महात्मा फुले बाजार राज्यात प्रसिद्ध आहे. नागपूर येथून हिरव्या मिरचीची सुमारे पंचवीस टनावर आवक झाली.
Chakan  Vegetable Market News
Chakan Vegetable Market NewsAgrowon
Published on
Updated on

Chakan News: येथील महात्मा फुले बाजारात गुजरात राज्यातून सुमारे पाच टन हिरव्या ढोबळी मिरचीची (Capsicum Arrival) आवक झाली. तसेच भावनगरी मिरचीची (Bhavnagari Chili) पाच टन आवक झाली.

हिरव्या ढोबळी मिरचीला किलोला पंचवीस रुपये तर भावनगरीला ३० रुपये प्रति किलोला भाव मिळाला. फळभाज्यांचे भाव (Vegetable Rate) मात्र बाजारात गडगडले आहेत. त्यामुळे शेतकरी, व्यापारी चिंता व्यक्त करत आहेत.

चाकण (ता. खेड) येथील महात्मा फुले बाजार राज्यात प्रसिद्ध आहे. नागपूर येथून हिरव्या मिरचीची सुमारे पंचवीस टनावर आवक झाली. हिरव्या मिरचीला बाजारात आज पस्तीस रुपये प्रति किलोला भाव मिळाला. हिरव्या मिरचीचा भाव प्रति किलो दहा रुपयांनी घसरला आहे.

मध्यप्रदेशातून हिरव्या वाटाण्याची सुमारे चाळीस टन आवक झाली. वाटाण्याला पंचवीस रुपये एका किलोला भाव मिळाला. राजस्थान राज्यातून जोधपुरी गाजराची सुमारे पंचवीस टन आवक झाली.

गाजराला घाऊक बाजारात प्रति किलोला वीस, बावीस रुपये भाव मिळाल्याचे व्यापारी रवींद्र बोराटे, गणेश झगडे, अनिकेत बोराटे, आबा गोरे, चांगदेव बोराटे, भानुदास बुट्टे, खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव बाळासाहेब धंद्रे यांनी सांगितले.

Chakan  Vegetable Market News
Chili Intercrop : मिरचीत मेथीचे आंतरपीक

बाजारात मोठ्या प्रमाणात परराज्यातून तसेच नागपूर, बीड, नाशिक येथून फळभाज्यांची आवक होते. राज्यातील फळभाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. बाजारात फळभाज्या ह्या परराज्यातून येतात. कर्नाटक, आंध्रप्रदेश, गुजरात, राजस्थान, दिल्ली, सिमला या भागातून फळभाज्यांची आवक सातत्याने होत आहे.

सध्या हिरवी मिरचीही मध्यप्रदेश, नागपूर, गुजरात राज्यातून मोठ्या प्रमाणात विक्रीस येत आहे. हिरव्या मिरचीला मोठी मागणी आहे.

हिरव्या मिरचीचे भाव आवक वाढल्याने घसरले असल्याचे व्यापारी रवींद्र बोराटे, चांगदेव बोराटे, कुमार गोरे, अनिकेत बोराटे, आबा गोरे, ज्योतिबा गोरे, भानुदास बुट्टे, सुनील वहिले यांनी सांगितले.

Chakan  Vegetable Market News
Green Chili Market : कळमना बाजारात हिरव्या मिरचीच्या दरात सुधारणा

चाकण बाजारात पिंपरी चिंचवड, कोकण तसेच जिल्ह्यातून किरकोळ विक्रेते फळभाज्या खरेदी करण्यासाठी येतात. घाऊक बाजारात वांगी, भेंडी, गवार, पावटा, तुरमुड्या वाल यांचे भाव प्रति किलोला पन्नास, साठ ते ऐंशी रुपये आहेत.

किरकोळ बाजारात या फळभाज्या ७० ते ८० रुपये प्रति किलोंनी विकल्या जात आहेत. हिरवी मिरची ही किरकोळ बाजारात ऐंशी रुपये प्रति किलोने विकली जात आहे. या भाव वाढीचा फटका सर्वसामान्य ग्राहकाला बसला आहे.

भाव कमी असल्याने टोमॅटोला उठाव

टोमॅटोचे भाव घाऊक बाजारात प्रति किलोला आठ ते दहा रुपये आहेत. भाव फारच कमी असल्याने शेतकरी चिंतेत आहे. फ्लॉवर, कोबीचा भाव बाजारात प्रति किलोला पाच ते दहा रुपये मिळाला.

हे भाव इतर भाववाढीच्या तुलनेत फार कमी आहेत. टोमॅटोची आवक बाजारात पन्नास टन झाली. भाव कमी असल्याने टोमॅटोला उठाव मोठा राहिला असे व्यापारी रवींद्र बोराटे यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com