Bogus Onion Subsidy : बोगस कांदा अनुदानप्रकरणी बाजार समिती सचिवांसह १६ जणांवर गुन्हा

A Case of Fraud has been Registered : बोगस कांदा अनुदान लाटण्याच्या उद्देशाने संगनमताने शासनाची १ कोटी ८८ लाख ४७ हजार ५२४ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी श्रीगोंदे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव दिलीप डेबरे यांच्यासह सोळा जणांविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
Onion Subsidy
Onion SubsidyAgrowon

Nagar News : बोगस कांदा अनुदान लाटण्याच्या उद्देशाने संगनमताने शासनाची १ कोटी ८८ लाख ४७ हजार ५२४ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी जिल्हा विशेष लेखापरीक्षक (सहकारी संस्था) राजेंद्र निकम यांच्या फिर्यादीवरून श्रीगोंदे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव दिलीप डेबरे यांच्यासह सोळा जणांविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. संभाजी ब्रिगेडचे नेते टीळक भोस यांनी याबाबत तक्रार केल्यानंतर चौकशी करण्यात आली होती.

सचिव दिलीप डेबरे यांनी १३६४ लाभार्थ्यांसाठी ४ कोटी ३२ लाख ४७ हजार ४३७ रुपयांचे कांदा अनुदान मिळण्यासाठी शासनाकडे मागणी प्रस्ताव सादर केला होता. याबाबत सचिव दिलीप डेबरे यांनी तब्बल ३ कोटी रुपयांचे बोगस कांदा अनुदान प्रस्ताव सादर केल्याची तक्रार टिळक भोस यांनी केली होती.

Onion Subsidy
Onion Nursery Damage : खानदेशात कांदा रोपवाटिकांचे नुकसान

या तक्रारीनुसार ३०२ लाभार्थ्यांच्या प्रस्तावासोबतच्या सातबाऱ्यावर ऑनलाईन कांदा नोंदी आढळून आल्या नाहीत. त्याचबरोबर समितीतून बोगस पावत्या बनविण्यात आल्यचे चौकशीत आढळून आले.

Onion Subsidy
Onion Subsidy : श्रीगोंद्यात कांदा अनुदानात एक कोटी ८८ लाखांचा गैरव्यवहार

त्यानुसार जिल्हा विशेष लेखापरीक्षक (सहकारी संस्था) राजेंद्र फकिरा निकम यांच्या फिर्यादीवरून श्रीगोंदे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव दिलीप डेबरे यांच्यासह आडते/व्यापारी हवालदार ट्रेडिंग कंपनी व त्यांचे दिवाणजी महादेव लोखंडे,

सत्यम ट्रेडर्स श्रीगोंदे, राज ट्रेडर्स श्रीगोंदे, मापाडी घनश्याम चव्हाण, शरद होले, संदीप शिंदे, राजू सातव, सोपान सिदनकर, दत्तात्रय राऊत, झुंबर किसन सिदनकर, संतोष दिलीप शेंडगे, भाऊ मारुती कोथिंबीरे, महेश सुरेश मडके, परशुराम गोविंद सोनवणे अशा सोळा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com