Baramati Market Committee : बारामती बाजार समिती ई-नाममध्ये राज्यात प्रथम

E- Naam : या प्रणालीत गूळ, तेलबिया घेण्याचा समितीचा मानस
Market Committee
Market Committee Agrowon
Published on
Updated on

अॅग्रोवन वृत्तसेवा
Agricultural Produce Market Committee : पुणे : बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकरी व व्यापाऱ्यांच्या हितासाठी मुख्य यार्ड तसेच सुपे व जळोची उपबाजार आवारात विविध सोई-सुविधा राबविलेल्या आहेत. बारामतीच्या मुख्य यार्डात २०१९ पासून रेशीम कोष खरेदी विक्री ई-नाम प्रणाली वापरली जात आहे. या प्रणालीला स्मार्ट प्रकल्पांतर्गत बारामती बाजार समितीला राज्यातील एकूण ३०५ बाजार समित्यांमध्ये प्रथम क्रमांक मिळाला आहे.

भारत सरकारच्या ई-नाम योजनेमध्ये अधिकाधिक शेतकऱ्यांना सहभागी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. केंद्रीय कृषी शेतकरी कल्याण विभागाच्या कृषी व्यापार संघातर्फे लघू चित्रपट बनविला जाणार आहे. त्याकरिता देशातून ८ राज्यांतील आठ बाजार समित्यांची निवड झाली आहे. त्यात राज्यातून बारामती बाजार समितीची निवड झाली आहे.

Market Committee
Sangli Market Committee : बाजार समिती निधीत गैरव्यवहार; दोषींवरील कारवाईस टाळटाळ

बारामतीमध्ये रेशीम कोष खरेदी विक्री केंद्रावर रेशीम कोषाची ई-लिलाव पद्धती २८ सप्टेंबर २०२२ पासून सुरू केलेली आहे. त्यानुसार डीडी किसान वाहिनीतर्फे बारामती बाजार समितीची विविध उपक्रमांची शूटिंग करण्यात आली आहे. डीडी किसान वाहिनी ई-नाम प्रणालीला साह्य करणार आहे. त्यामध्ये शेतकरी, एफपीओ, व्यापारी, ई-नामच्या यशस्वी गोष्टी, चित्रफिती प्रसारित करण्यात येणार आहेत. समितीचे सभापती सुनील पवार आणि उपसभापती नीलेश लडकत यांच्या मार्गदर्शनाखाली ई-नाम प्रणाली चांगल्या प्रकारे राबविण्यात येत आहे. भविष्यात गूळ आणि तेलबिया ई-नाम प्रणालीमध्ये घेण्याचा समितीचा मानस आहे.
‘‘शेतकऱ्यांनी नाव नोंदणी व शेतीमालाच्या नोंदणीसाठी सहकार्य करावे. तसेच खरेदीदार व आडत्यांनी ई-नाममध्ये सहभागी व्हावे. यामुळे देशातील बाजार समित्या एका ई-ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर येतील. आंतरराज्यातील व्यापारास चालना मिळेल. तसेच देशभरातील शेतीमालास चांगला दर मिळेल. धान्य मार्केटला ई-नाम प्रणालीत कमी प्रतिसाद मिळत आहे. शेतीमालाचे ग्रेडिंग होऊन त्याची ई-नाम पोर्टलवर विक्री झाल्यास आंतरराज्य, इंटर मंडी ई-लिलाव व ई-पेमेंट होऊ शकते,’’ अशी माहिती सचिव अरविंद जगताप यांनी दिली.

कोषाची १३१ टन विक्री
रेशीम कोष खरेदीदार ऑनलाइन ट्रेडिंगमध्ये सहभागी होत आहेत. रेशीम कोष लिलाव ऑनलाइन घेतले जातात. यामध्ये शेतकरी नोंदणी, प्रवेश नोंदणी, कोषाची गुणवत्ता तपासणी, विक्री रेशो, त्यानंतर ऑनलाइन लिलाव आणि अॅक्सिस बँकेमार्फत ई-पेमेंट केले जाते. २०२२ पासून १७०० शेतकऱ्यांच्या १३१ टन कोषाची विक्री
होऊन साधारण ७ कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे.

शेतीमालाची नोंद आणि इतर स्थिती
गेट एन्ट्री---१ लाख
आवक---७ लाख क्विंटल
शेतकरी---६१ हजार ८३०
केवायसी धारक (शेतकरी)---११९६ (कायमस्वरूपी), ४४ खरेदीदार, ४२ अडते
रेशीम कोष---७ खरेदीदार
पराज्यातील परवानाधारक---तमिळनाडू, कर्नाटक, केरळ, तेलंगणा, पश्‍चिम बंगालमधील ७ खरेदीदार

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com