Water Project Agrowon
ॲग्रो विशेष

Water Project: २८६९ कोटी रुपयांच्या जल व ऊर्जा प्रकल्पांसाठी मंत्रिमंडळाने मंजुरी दिली!

Approval in the Cabinet Meeting: कृष्णा-कोयना उपसा सिंचन योजनेअंतर्गत म्हैसाळ उपसा सिंचन योजनेसाठी सौर ऊर्जा प्रकल्प उभारणे आणि योजनेची ऊर्जा कार्यक्षमता सुधारण्यासाठी १ हजार ५९४ कोटी रुपये तर जळगाव जिल्ह्यामधील वरखेडे लोंढे (बॅरेज) (ता. चाळीसगाव) या मध्यम प्रकल्पाच्या १ हजार २७५ कोटी ७८ लाख अशा दोन हजार ८६९ कोटी रुपयांच्या सुधारित तरतुदीस मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली.

बाळासाहेब पाटील

Mumbai News: कृष्णा-कोयना उपसा सिंचन योजनेअंतर्गत म्हैसाळ उपसा सिंचन योजनेसाठी सौर ऊर्जा प्रकल्प उभारणे आणि योजनेची ऊर्जा कार्यक्षमता सुधारण्यासाठी १ हजार ५९४ कोटी रुपये तर जळगाव जिल्ह्यामधील वरखेडे लोंढे (बॅरेज) (ता. चाळीसगाव) या मध्यम प्रकल्पाच्या १ हजार २७५ कोटी ७८ लाख अशा दोन हजार ८६९ कोटी रुपयांच्या सुधारित तरतुदीस मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली.

या प्रकल्पामुळे योजनेसाठी लागणाऱ्या दरवर्षी सुमारे ३९८ दशलक्ष युनिट विजेची गरज भागवली जाणार आहे. कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्पाअंतर्गत ताकारी व म्हैसाळ अशा दोन स्वतंत्र उपसा सिंचन योजनांचा समावेश आहे. सिंचन योजनेचा उद्भव कृष्णा नदीवर म्हैसाळ येथे आहे. येथून विविध टप्प्यांमध्ये २३.४४ अघफू पाणी उचलून त्याद्वारे सांगली जिल्ह्यातील मिरज, कवठे महांकाळ, तासगांव, जत व सोलापूर जिल्ह्यातील सांगोला व मंगळवेढा या तालुक्यांतील अवर्षण प्रवण भागातील १ लाख, ८ हजार, १९७ हेक्टर क्षेत्रास सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे.

या प्रकल्पाच्या मंजुरीवेळीच प्रकल्पांतर्गत पाणी उपसा करण्यासाठी लागणाऱ्या ऊर्जा स्रोतांमध्ये सौर ऊर्जा वापराचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा व आनुषंगिक अटी घातल्या होत्या. यामुळे म्हैसाळ उपसा सिंचन योजनेसाठी लागणाऱ्या विजेच्या वापरापोटी होणाऱ्या खर्चात बचत होणार आहे. या ऊर्जा कार्यक्षम जलव्यवस्थापन व सौर ऊर्जा प्रकल्प राबविण्यासाठी भांडवल निधीसाह्याच्या प्राथमिक प्रकल्प अहवालास केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयानेही मान्यता दिली आहे.

योजनेचा वीज वापराचा खर्च कमी करणे व ग्रीन एनर्जी निर्मितीसाठी कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून हा ऊर्जा कार्यक्षम जलव्यवस्थापन प्रकल्प राबवण्यात येणार आहे. या करिता केएफडब्ल्यू जर्मन बँकेकडून १३० मिलियन युरो (अंदाजे १ हजार १२० कोटी) कर्ज स्वरूपात व ४७४ कोटी राज्य शासनाची गुंतवणूक अशा एकूण १ हजार ५९४ कोटी किमतीच्या प्रकल्पासाठी त्रिपक्षीय करार करण्यास मान्यता दिली आहे.

या ऊर्जा कार्यक्षम जलव्यवस्थापनात म्हैसाळ योजनेतील एकूण १०८ पंपांपैकी ६५ पंप नवीन ऊर्जा कार्यक्षम पंप पद्धतीचे असतील. तसेच यात एपीएफसी व एससीएडीए- स्काडा यंत्रणा बसवणे व २०० मे.वॅ. क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारणी करणे, तयार झालेली वीज स्वतंत्र विद्युत वाहिनीद्वारे २२०/३३ के. व्ही. नरवाड उपकेंद्रापर्यंत पुरवणे या कामांचा समावेश आहे.

वरखेडे लोंढे बॅरेजसाठी १२७५ कोटी

जळगाव जिल्ह्यामधील वरखेडे लोंढे (बॅरेज) (ता. चाळीसगाव) या मध्यम प्रकल्पाच्या १ हजार २७५ कोटी ७८ लाख रुपयांच्या सुधारित तरतुदीस मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. हा प्रकल्प तापी पाटबंधारे विकास महामंडळ, जळगाव अंतर्गत गिरणा नदीवर मौजे वरखेडे बु. येथून दीड किलोमीटरवर आहे.

या प्रकल्पाचा पाणीसाठा ३५.५८७ दशलक्ष घनमीटर इतका असून, उपयुक्त पाणीसाठा ३४.७७२ दलघमी इतका असणार आहे. या बॅरेज प्रकल्पामुळे चाळीसगाव, भडगाव तालुक्यातील ८ हजार, २९० हेक्टर क्षेत्राला सिंचन सुविधा उपलब्ध होणार आहे. त्याअनुषंगाने या प्रकल्पाच्या खर्चास आज मंत्रिमंडळ बैठकीत तिसरी प्रशासकीय मान्यता देण्यात आली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nashik Industrial Development: नवीन मोठ्या उद्योगांसह प्रकल्प येण्यासाठी पोषक वातावरण: मंत्री छगन भुजबळ

ZP Election 2025: पाच तालुक्यांतील गटांच्या संरचनेत बदल

Farmer Income: शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यामध्ये कोरडवाहू फळपिकांचे मोठे योगदान

Zilla Parishad elections: अहिल्यानगर ‘झेडपी’ची अंतिम प्रभाग रचना जाहीर

Crop Loan: किसान क्रेडिट कार्डचे एक हजार पीककर्ज प्रस्ताव मंजूर करा: जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

SCROLL FOR NEXT