Jalgaon News: खानदेशात सातपुडा पर्वतातील तेंदू पत्ता व्यवसाय यंदा प्रतिकूल वातावरण, वादळी पाऊस आदी कारणांनी अडचणीत आला होता. गत उन्हाळ्यात वादळात तेंदू पत्ता गळून नुकसान झाले. तसेच झाडांवरून तोडलेली पाने व्यवस्थित वाळत नसल्यानेही फटका बसला. तेंदू पत्ता व्यावसायिकांसह स्थानिक ग्रामस्थांना मदतनिधी दिला जावा, अशी मागणी करण्यात आली आहे. .खानदेशात नंदुरबारातील अक्कलकुवा, धडगाव, शहादा, धुळ्यातील शिरपूर, जळगावातील यावल, रावेर भागात सातपुडा पर्वतात तेंदूपत्ता व्यवसाय आहे. वन क्षेत्रात ही झाडे असून, कायद्यानुसार या झाडांचे संवर्धन, व्यापारविषयक अधिकार स्थानिक ग्रामपंचायतींना आहेत. या ग्रामपंचायती स्थानिक संस्था, गटांना तेंदू पत्ता तोडून त्याची विक्री, संवर्धन आदींचे कंत्राट, करार करतात. सर्वाधिक व्यवसाय नंदुरबारात आहे. त्यापाठोपाठ जळगावातील सातपुड्यात तेंदू पत्ता व्यवसाय आहे..Tendu Leaf : मजुरांचा सुरक्षेशिवाय जंगलात तेंदूपत्ता संकलन .एप्रिल व या महिन्यात हा व्यवसाय गती घेतो. परंतु यंदा सातपुड्यात भर उन्हाळ्यात वादळी पाऊस, हलकी गारपीट व प्रतिकूल स्थिती राहीली होती. तेंदूपत्ता मोठ्या प्रमाणात गळून त्याची हानी झाली. संबंधित गट, संस्थांना व्यवसाय करताना नुकसान सहन करावे लागत असून, ग्रामपंचायतींचे निधी संकलनही कमी झाले होते..ऐन हंगामात अडचणीतेंदू पत्ता तोडल्यानंतर तो चांगला वाळवावा लागतो. परंतु ऐन उष्णता, उन्हाळ्याच्या काळात सातपुड्यात निरभ्र, कोरडे वातावरण नव्हते. मध्येच हलका पाऊस यायचा. ढगाळ, आर्द्रतायुक्त वातावरण होते. अशात तेंदूपत्ता वाळत नाही. वाळवणूक चांगली होत नसल्याने दर्जाही घसरतो..Tendu Collection: हंगामात २०० कोटी रुपयांचे तेंदूपाने संकलन .याचा फटका त्या भागात बसला. खरेदीदार तेंदूपत्ता खरेदीस नकार देत होते. परवानाधारक खरेदीदारच तेंदू पत्ता घेवू शकत होते. यामुळे अनेकांच्या तेंदूपत्त्याची विक्री होऊ शकली नाही. वन विभागाने यासंबंधीचे परवाने दिले होते. खरेदीदारांची संख्याही कमी आहे. यामुळेदेखील अडचणी तयार होतात..ठळक बाबीजळगावातील यावल, रावेर, नंदुरबारातील धडगाव भागात अनेक गट, संस्थांचे तेंदूपत्ता संकलन उन्हाळ्यात सुरू होतेनैसर्गिक समस्यांनी वित्तीय संकटे तयार झालीतेंदूपत्त्यातून संबंधित करारधारक गट, ग्रामपंचायतींचे वित्तीय नुकसान झाल्याने त्यांना मदतनिधी दिला जावा, अशी मागणी करण्यात आली होती. मागणी मात्र दुर्लक्षित राहीली.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या धामधुमीत हा मुद्दा पुन्हा एकदा आदिवासी क्षेत्रात तयार झाला आहे.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.