Chhatrapati Sambhajinagar News: मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या जिल्ह्यांत सर्वसाधारण ७ लाख २७ हजार ५७४ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत ७२ हजार ४७० हेक्टरवरच रब्बीची पेरणी झाली आहे. तिन्ही जिल्ह्यांत पेरणीची गती संथच आहे. .यंदाच्या खरीप हंगामासाठी छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तीन जिल्ह्यांत रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र ७ लाख २७ हजार ५७४.८२ हेक्टर आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील २ लाख ३८ हजार ८२१.५५ हेक्टर, जालन्यातील २ लाख ११ हजार ८१९.७२ हेक्टर तर बीड जिल्ह्यातील २ लाख ७६ हजार ९३३.५५ हेक्टर क्षेत्राचा समावेश होतो..Rabi Sowing: बुलडाणा जिल्ह्यात रब्बी लागवडी संथ.पेरणी झालेल्या क्षेत्रामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वात कमी २९३८ हेक्टरवर म्हणजे सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत केवळ १.२३ टक्के क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली आहे. त्यातही केवळ रब्बी ज्वारी, गहू, मका, इतर तृणधान्य, हरभरा या पिकाच्या पेरणी झालेल्या क्षेत्राचा समावेश आहे..जालना जिल्ह्यात २६ हजार २३९ हेक्टरवर म्हणजे सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत १२.३९ टक्के क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली आहे. यामध्ये रब्बी ज्वारी, गहू, मका, हरभरा आदी पिकांच्या क्षेत्राचा समावेश आहे. बीड जिल्ह्यात ४४ हजार २९३ हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली.त्यामध्ये तृणधान्य, कडधान्य व गळीत धान्यांच्या क्षेत्राचा समावेश आहे..Rabi Sowing: अहिल्यानगरमध्ये रब्बी पेरणी दहा टक्के.पावसाचा खोडा; त्यात आर्थिक चणचण!रब्बीच्या पेरणीत पावसाच्या सातत्यानेही खोडा घालण्याचे काम केले आहे. अनेक भागांत अजूनही जमिनीत वाफसा नसल्याने मशागत व पेरणी करणे शक्य नाही. याशिवाय नैसर्गिक आपत्तीने केलेले नुकसान शेतकऱ्यांसाठी आर्थिक चणचण निर्माण करून गेले..तीन जिल्ह्यांतील पीकनिहाय रब्बी पेरणी क्षेत्र (हेक्टरमध्ये)ज्वारी ३७८४७गहू ५९२६मका २५२५इतर तृणधान्य ४हरभरा ९२६०४.इतर कडधान्य २६५७करडई ३५जवस १०३तीळ १९५सूर्यफूल १८.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.