
Hingoli News : बोराळा (ता. हिंगोली) येथील साठवण तलाव क्र. २ चे काम १६ जानेवारी २०२४ पासून सुरु असून सद्य:स्थितीत तलावाचे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे, अशी माहिती गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता आ. अ. कांबळे यांनी दिली.
सध्या बोराळा तलावाच्या कंदरभरणीचे २० टक्के काम बाकी आहे. त्यामुळे बोराळा येथील शेतकरी आणि गावकऱ्यांनी बांधकामाच्या दर्जाबाबात आक्षेप घेत जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्याकडे निवेदन केले होते.
मात्र लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता आ. अ. कांबळे यांनी जिल्हाधिकारी गोयल यांच्या आदेशान्वये तलावाच्या बांधकाम ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तक्रारी आणि आक्षेपाचे निरसन केले असून तलावाचे बांधकाम प्रक्रिया सुरळीत सुरू असल्याचे कांबळे यांनी सांगितले.
शनिवार (ता. ८) रोजी बोराळा येथील काही शेतकरी व गावकरी यांनी कामावर जाऊन काम निकृष्ट असल्याचे सांगून काम बंद केले होते. त्यानंतर त्यांनी मंगळवारी (ता. ११) जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्याकडे तलावाचे काम निकृष्ट दर्जाचे होत असून कामात तडे गेले आहेत अशी तक्रार दिली होती.
गुरुवारी (ता. १३) कार्यकारी अभियंता आणि गावकऱ्यांनी चर्चेअंती तलावाशी संबंधीत अभियंते व बारोळा गावातील शेतकरी, पदाधिकारी व गावकऱ्यांना प्रत्यक्ष तलाव बांधकाम होत असलेल्या ठिकाणी कामाची संयुक्त पाहणी केली. गावकऱ्यांनी उपस्थित केलेल्या संधानक कामाच्या गुणवत्तेबाबतच्या शंकांचे निरसन केले.
संधानककामाचे मूळ काम व जलशिपन करण्यासाठी अनुषंगीक कामे याची खातरजमा करून तसेच संधानक कामात पडलेल्या लहान तड्यां (हेअर क्रॅक) बाबतही कार्यकारी अभियंता कांबळे यांनी शेतकऱ्यांचे शंका निरसन केले.
त्यानंतर शेतकऱ्यांनी वाढीव काम व रस्त्याबाबत मागणी केली. त्यावर कार्यकारी अभियंता यांनी सक्षम स्तरावरुन मान्यतेकरीता प्रस्ताव पाठविला जाईल असे सांगितले. त्यामुळे गावकऱ्यांनी बांधकामाबाबत इतर कोणतीही तक्रार नसल्याचे कांबळे यांनी सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.