Railway Broad Gauge Agrowon
ॲग्रो विशेष

Akola-Khandwa Broad Gauge : अकोला-खंडवा ब्रॉडगेज होणार

Railway Update : दक्षिण-मध्य रेल्वेच्या सिकंदराबाद मुख्यालयाकडून अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जमीन वापरली जात आहे.

Team Agrowon

Akola News : अकोला जिल्ह्यातून जात असलेला बहुचर्चित अकोला-खंडवा मिटरगेज मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रुपांतरण केले जाणार आहे. यासाठी दक्षिण-मध्य रेल्वेच्या सिकंदराबाद मुख्यालयाकडून अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जमीन वापरली जात आहे.

या जमिनीचे अधिग्रहण करण्याबाबत नुकतीच राजपत्राद्वारे अधिसूचना जारी करण्यात आली. आता ब्रॉडगेजनिर्मीतीला गती मिळेल असे बोलले जात आहे. या मार्गासाठी महाराष्‍ट्र व मध्य प्रदेशाच्या हद्दीतील वनजमीनही वापरली जाणार आहे.

अकोला, बुलडाणा जिल्हाधिकाऱ्यांना प्राधिकारी म्हणून नेमण्यात आले आहे. या रेल्वे मार्गासाठी लागणारी जमीन संपादित करण्यासाठी, आक्षेप, हरकती निकाली काढण्याच्या उद्देशाने अकोला, बुलडाणा जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

अकोला- खंडवा ब्रॉडगेजसाठी अकोट ते आमला खुर्द दरम्यान मार्गावर समस्या उदभवत होती. ती कोंडी आता दूर होणार आहे. या रेल्वे मार्गाचा १०० गावातील नागरिकांना लाभ होईल. मध्य प्रदेशातून १५ किलोमीटर आणि महाराष्ट्रातून ५ किलोमीटर वनजमीन संपादित करावी लागणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT