Beed News: शिरूरकासार तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खरीप पेरण्या मृग नक्षत्रातील रिमझिम पावसावरच पार पडल्या होत्या. त्यानंतर दोन महिन्यांपासून पावसाने दडी मारली, मात्र पिके तग धरून होती. दोन दिवसांपासून झालेल्या जोरदार पावसामुळे तालुक्यातील सर्व मंडलांतील ४६ हजार हेक्टर क्षेत्रातील कपाशी, तूर, बाजरी, उडीद, मूग, मका, सोयाबीन या पिकांना संजीवनी मिळाली आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होेत आहे..जोरदार पावसामुळे तालुक्याला वरदान ठरणारा सिंधफणा मध्यम प्रकल्प तुडुंब भरल्याने सांडव्यावरून पाणी पडू लागले आहे. सिंधफणा नदीला प्रवाह आला आहे. यंदा पावसाचा हंगाम मुबलक होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला होता. मे महिन्यात झालेल्या मॉन्सूनपूर्व पावसामुळे शेतकऱ्यांनी शेतीची मशागत करून जून महिन्यात मृग नक्षत्रात पेरण्या पूर्ण केल्या..Heavy Rain: परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील ११ मंडलांत अतिवृष्टी.पिकावर खत, कोळपणी, फवारणी यावर शेतकऱ्यांनी मोठा खर्च केला होता. त्यात अधूनमधून आर्द्रा, पुनर्वसु, पुष्य या नक्षत्रात काही भागात रिमझिम पाऊस पडला, पण मोठा पाऊस झाला नव्हता. आश्लेषा नक्षत्र सुरू झाल्यानंतर खलापुरी, आर्वी, औरपूर, तिंतरवणी, पाडळी, मातोरी, शिंगारवाडी आदी भागात मध्यम पाऊस पडला. शनिवारी व रविवारी सर्वच मंडलांत चांगला पाऊस झाल्याने पिकांना मोठा फायदा झाला..सिंधफणा प्रकल्पासह मोरजळवाडी लघू प्रकल्प ८६ टक्के, तर वार्णी लघू प्रकल्प २५ टक्के भरला आहे. उर्वरित प्रकल्पातही पाणीसाठा वाढत असल्याचे जलसिंचन विभागाचे अभियंता विजय पाखरे यांनी सांगितले. .Monsoon Heavy Rain: मुसळधार पाऊस, पूरस्थितीचा फटका .एक जून ते नऊ ऑगस्टदरम्यान तालुक्यात २१२.९ मिमी पाऊस झाला आहे, तर मे महिन्यातच १९० मिमी पाऊस पडला होता. त्यामुळे पुढील पावसामुळे विविध तलाव व पाझर तलाव भरतील अशी अपेक्षा आहे. या पावसामुळे ओढे-नाले वाहू लागले असून छोटे-मोठे तलाव भरले आहेत..तिंतरवणी-निमगाव मायंबा, ब्रह्मनाथ येळंब-आनंदगाव फाटा, शेकडा-शिंगारवाडी, राळेसांगवी-ब्रह्मनाथ येळंब या रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहनचालकांना कसरत करत वाहने चालवावी लागत आहेत. सिद्धेश्वर बंधाऱ्यात पाणी आल्याने शहर, परिसरातील टंचाई कमी होण्यास मदत होणार आहे.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.