Railway Income : भुसावळ रेल्वेने एका दिवसात मिळविले साडेतीन कोटींचे उत्पन्न

Railway Department : भुसावळ रेल्वे विभागाने आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये एका दिवसात माल वाहतुकीतून सर्वाधिक महसूलचा विक्रम केला.
Railway
RailwayAgrowon

Jalgaon News : भुसावळ रेल्वे विभागाने आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये एका दिवसात माल वाहतुकीतून सर्वाधिक महसूलचा विक्रम केला. मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने १२ मार्चला तीन कोटी ५९ लाख किमतीची माल वाहतूक केली. जी चालू आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये एका दिवसातील सर्वाधिक आहे. आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट माल वाहतूक आहे.

भुसावळ विभागात २४ गुड्स शेड आणि १२ साइडिंग आहेत. जिथून भारताच्या सर्व भागांमध्ये अनेक प्रकारचा माल लोड केला जातो. नाशिक, जळगाव, धुळे, बुलडाणा, अकोला, अमरावती आणि खंडवा जिल्ह्यांत पसरलेल्या गुड्स शेड्समधून पेट्रोलियम, डी-ऑइल्ड केक्स, कांदा, गहू, मका आदी वस्तू लोड केल्या जातात. गेल्या काही वर्षांत भुसावळ विभाग नाशिक शहरातून ऑटोमोबाइल लोडिंगला आकर्षित करण्यात यशस्वी झाला आहे.

Railway
Vande Bharat Railway : जालना ते मुंबई वंदे भारत रेल्वे सुरू

१२ मार्चला एकूण ३२ हजार १०१ टन विविध माल ५१७ वॅगनमध्ये ११.५ रॅकच्या समप्रमाणात लोड केला गेला. या दिवशी विभागाला एकूण ३ कोटी ५९ लाखोंचा महसूल माल वाहतुकीतून प्राप्त झाला. ५१७ वॅगनपैकी मनमाड येथील भारत पेट्रोलियम डेपोमधून १५० वॅगन्स पेट्रोलियमने लोड करण्यात आल्या.

पारस थर्मल स्टेशनवरून १६६ वॅगन कोळशाच्या, लासलगाव आणि मनमाड येथून ६९ वॅगन कांद्याच्या, ४९ वॅगन ऑटोमोबाइलच्या, ४२ वॅगन खंडवा येथून गव्हाच्या, ओरिएंट सिमेंट कारखाना जळगाव येथून २१ वॅगन आणि चाळीसगाव येथून २० वॅगन चाऱ्याच्या अशा एकूण ५१७ वॅगन लोड करण्यात आल्या.

पिंपरखेड-चाळीसगाव रेल्वे मार्गावर तिसरी लाइन सुरू

मध्य रेल्वेने भुसावळ-मनमाड तिसऱ्या मार्गाच्या विद्युतीकरण प्रकल्पाच्या विद्युतीकरणासह पिंपरखेड ते चाळीसगाव सेक्शनची २५ किलोमीटरची नवीन तिसरी लाइन यशस्वीरीत्या सुरू केली आहे. मध्य रेल्वेने ३२.०७ किलोमीटर पिंपरखेड ते चाळीसगाव सेक्शनची नवीन तिसरी लाइन विद्युतीकरणासह यशस्वीपणे सुरू केल्याची घोषणा केली आहे. जो महत्त्वाकांक्षी १८३.९४ किलोमीटर भुसावळ-मनमाड तिसरी लाइन विद्युतीकरण प्रकल्पातील एक महत्त्वाचा टप्पा आहे.

Railway
Pune Nashik Railway : पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेची ‘गती’ वाढणार!

हे यश आयुक्त, रेल्वे संरक्षा (सीआरएस), सेंट्रल सर्कल यांच्या देखरेखीखाली काळजीपूर्वक सुरक्षा तपासणी आणि १२० किलोमीटर प्रतितास गती चाचणीनंतर मिळालेले आहे. या विभागात पिंपरखेड, नायडोंगरी, हिरापूर आणि चाळीसगाव यासह धोरणात्मकदृष्ट्या स्थित स्थानके आहेत, ज्यापैकी प्रत्येक स्थानकाच्या यार्डमध्ये बदल करण्यात आले आहेत.

मुंबई-हावडा या व्यग्र मार्गाचा अविभाज्य भाग असलेल्या मनमाड-भुसावळ विभागातील वाहतूक गर्दी कमी करण्यासाठी या नवीन तिसऱ्या लाइनची यशस्वी अंमलबजावणी होणार आहे. हे परिवर्तन केवळ ऑपरेशनल कार्यक्षमताच वाढणार नाही तर रेल्वे नेटवर्कवर ट्रेनचा वेगदेखील वाढवेल, ज्यामुळे प्रवासाचा अनुभव वाढेल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com