Land Acquisition Compensation : रेल्वे मार्गासाठी जमिनीला कमी मोबदल्यामुळे नाराजी

Akola Khandwa Broad Gauge- Railway Line : अकोला-खंडवा ब्रॉडगेज रेल्वे मार्गासाठी सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या गावांमधील शेतजमिनीच्या अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, या जमिनीचा मोबदला अत्यल्प असल्याचा आरोप करीत शेतकरी विरोध दर्शवत आहेत.
Land Acquisition Compensation
Land Acquisition Compensation Agrowon
Published on
Updated on

Akola News : अकोला-खंडवा ब्रॉडगेज रेल्वे मार्गासाठी सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या गावांमधील शेतजमिनीच्या अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, या जमिनीचा मोबदला अत्यल्प असल्याचा आरोप करीत शेतकरी विरोध दर्शवत आहेत. योग्य मोबदला दिला न गेल्यास लोकसभा तसेच विधानसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Land Acquisition Compensation
Land Compensation : सोलापूर-धाराशिव रेल्वे मार्गासाठी संपादित जमिनीला अल्पमोबदला

सरकारच्या पुढाकाराने अकोला-खंडवा ब्रॉडगेज रेल्वे प्रकल्प साकारत आहे. पूर्वी मेळघाटमधून असलेला प्रकल्प आता सातपुडा पर्वताच्या पायथ्याने नेला जात आहे. यासाठी अकोला जिल्ह्यात तेल्हारा व अकोट तालुक्यात मोठ्या प्रमाणात जमिनीचे अधिग्रहण करावे लागणार आहे. ही प्रक्रिया राबवली जात आहे. यासाठी जमिनीचा अत्यल्प मोबदला दिला जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप निर्माण झाला आहे.

भूसंपादन अधिकारी स्वतःच्या नियमाने भूसंपादन दर निश्‍चित करीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांचा आहे. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी प्रत्येक टप्प्यावर भूसंपादन अधिकाऱ्यांना राज्यात याआधी बारमाही बागायतीप्रमाणे तसेच बाजार मूल्याप्रमाणे रेल्वेसाठी अमरावती विभागातील वर्धा-यवतमाळ-पुसद-नांदेड या रेल्वे प्रकल्पासाठी केलेल्या भूमी अधीग्रहणाच्या निवाड्याच्या प्रति सादर केल्या.

Land Acquisition Compensation
Land Acquisition Compensation : महामार्गबाधित अद्याप मोबदल्‍याच्या प्रतीक्षेत
या रेल्वे प्रकल्पासाठी खरेदी प्रमाणे निवाडा केलेला नाही. दहा वर्षांपूर्वी जर या भागात १८ लाख १३ हजार रुपये एकराचा दर शासनाचाच एक विभाग देत असेल तर आता दोन लाख रुपये दर कुठल्या आधारे निश्‍चित केला आहे. वास्तविक हा भाग वान प्रकल्प सिंचन क्षेत्रात मोडतो. आज प्रशासन शासनाच्या खरेदीला मानायला तयार दिसत नाही. त्यामुळे अकोट ते दानापूरपर्यंत (ता. तेल्हारा) आणि बुलडाणा जिल्ह्यातही महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत या प्रकल्प बाधित क्षेत्रातील गावांमधील शेतकरी मतदानावर बहिष्कार टाकणार आहेत.
राजकुमार भट्टड, अध्यक्ष, अकोला-खंडवा प्रकल्प बाधित शेतकरी संघर्ष समिती

जमिनीच्या कमी दरामुळे नाराजी

यंत्रणांनी संपूर्ण शेतीचे जिरायतीप्रमाणे व रेडी रेकनरप्रमाणे मूल्यांकन करून शेतकऱ्यांवर मोठा अन्याय केला आहे. यामुळे जमिनीचा दर काही ठिकाणी ५ लाख तर बहुसंख्य भागात दोन ते सव्वा दोन लाख रुपये एकरी काढण्यात आला आले. २०१५ मध्ये या भागात १८ लाख १३ हजार रुपये एकरी दराने मोबदला शासनाच्याच का विभागाने मोबदला दिलेला आहे. असे असताना आता दहा वर्षांनंतर दोन लाख रुपये दर महसूल विभागाने कुठल्या आधारे काढले याचे उत्तर शेतकऱ्यांना दिले जात नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com