Sugar Production  Agrowon
ॲग्रो विशेष

Sugar Production : साखर निर्मितीत कोटींच्या उड्डाणाला ब्रेक

Sugarcane Crushing Season 2025 : जिल्ह्यात १७ साखर कारखान्यांनी ऊस गाळप हंगाम यशस्वी पार पाडला आहे. विधानसभेच्या निवडणुकीमुळे एक महिना उशिरा सुरू झाला. यामुळे ऊस तोडणी यंत्रणा अनेक कारखान्यांची विस्कळीत झाल्याचे दिसून आले.

विकास जाधव 

Satara News : जिल्ह्यातील सर्वच कारखान्यांचा धुराडे बंद झाल्या असून ऊस क्षेत्र घटल्याने मागील पाच वर्षांपासून साखर निर्मितीत सुरू असलेल्या कोटीच्या उड्डाणाला ब्रेक लागला आहे. जिल्ह्यात १७ साखर कारखान्यांकडून ९४ लाख ३१ हजार २८८ टनांद्वारे ९१ लाख ५० हजार २७ क्विंटल साखर निर्मिती झाली आहे. गाळपात खासगी तर साखर निर्मितीत सहकारी कारखान्यांची आघाडी घेतली आहे.

जिल्ह्यात १७ साखर कारखान्यांनी ऊस गाळप हंगाम यशस्वी पार पाडला आहे. विधानसभेच्या निवडणुकीमुळे एक महिना उशिरा सुरू झाला. यामुळे ऊस तोडणी यंत्रणा अनेक कारखान्यांची विस्कळीत झाल्याचे दिसून आले. यामुळे वेळेत ऊस न तुटल्याच्या अनेक तक्रारी झाल्या. हंगाम उशिरा सुरू झाल्याने शेतकरी संघटनांकडून दरासाठी केली जाणारी आंदोलन यावेळी झालेली नाहीत. यामुळे विना अडथळा हंगाम सुरू राहिला आहे.

मात्र उसाचे क्षेत्र कमी झाल्याने गाळपास ऊस कमी पडला आहे. साडेतीन हजारांपासून ३२०० रुपयापर्यंत दर देण्यात आला आहे. १७ साखर कारखान्यांकडून ९४ लाख ३१ हजार २८८ टनाद्वारे ९१ लाख ५० हजार २७ क्विंटल साखर निर्मिती झाली आहे. यामध्ये आठ साखर कारखान्यांनी ४९ लाख ४७ हजार ८३३ गाळपाद्वारे ३९ लाख ९३ हजार ८५ क्विंटल साखर निर्मिती केली आहे.

खासगी कारखान्यांच्या साखर उताऱ्यात घट झाली असून, या कारखान्यांचा सरासरी ८.०७ टक्के साखर उतारा मिळाला आहे. तर नऊ सहकारी कारखान्यांनी ४४ लाख ८३ हजार ४५५ टनाद्वारे ५१ लाख ५६ हजार ९४२ क्विंटल साखर निर्मिती केली आहे.

सहकारी साखर कारखान्यांनी साखर उताऱ्यात आघाडी घेतली असून सरासरी ११.५ टक्के साखर उतारा मिळाला आहे.सर्वच कारखान्यांचा धुराड्यांना बंद झाल्या असून सर्वांत शेवट कृष्णा व सह्याद्री साखर कारखाना बंद झाला आहे. ऊसतोड मजूर आपल्या गावाला रवाना झाले आहेत.

अंतिम बिले जमा नाहीत

जिल्ह्यातील सर्व कारखाने बंद झाले असून अनेक कारखान्यांची फेब्रुवारी व मार्च महिन्यांत तुटलेल्या उसाची बिले देणे बाकी आहे. यामुळे शेतकऱ्यांना पीककर्ज नवी-जुनी करण्यासाठी अडचणी येत आहेत. ऊसबिले जमा न झाल्याने शेतकऱ्यांच्या व्यवहारावरही परिणाम झाला आहे.

काही कारखान्यांनी सोसायटीच्या कर्जापुरता हप्ता काढला जात आहे. बिले अडकल्याने विकास सेवा सोसायटीत कर्ज थकीत प्रमाण वाढले आहे. ३१ मार्चपर्यंत कर्ज नवी जुनी न झाल्याने डिव्हिडंट देताना अडचणी निर्माण होणार असल्याचे संस्थाचालकांकडून सांगितले जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Election Commission: निवडणूक आयोगाचा राहुल गांधींना इशारा; तर विरोधकांचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर महाभियोगाचा विचार

Heavy Rain : जोरदार पावसाने पश्चिम विदर्भात धुमाकूळ

India Security: आस समृद्धी अन् सुरक्षेची!

Kesar Mango Cultivation : मराठवाडा, विदर्भातील केसर आंबा उत्पादनातील संधीची मांडणी

Horticulture Development : आंबा पुनरुज्जीवनासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण

SCROLL FOR NEXT