Sugar Industry
Sugar IndustryAgrowon

Sugarcane Season End: कोल्हापूर, सोलापूर विभागांचा ऊस गाळप हंगाम समाप्‍त

Maharashtra Sugar Industry: कोल्हापूर आणि सोलापूर विभागातील साखर कारखान्यांसाठी यंदाचा ऊस गाळप हंगाम अधिकृतपणे संपला आहे. शेतकऱ्यांना आता अंतिम हिशोब आणि थकीत ऊस बिलाच्या रकमेकडे लक्ष लागले आहे.
Published on

Kolhapur News: गेल्या वर्षीपेक्षा कमी गाळप करीत राज्यातील साखर कारखाने पटापट बंद होत आहेत. राज्यात सर्वाधिक कारखाने असणारा सोलापूर तसेच सर्वाधिक साखर उत्पादन करणाऱ्या कोल्‍हापूर विभागाचाच संपूर्ण हंगाम यंदा राज्यात पहिल्यांदा संपला आहे. कोल्हापूर विभागातील ४०, तर सोलापूर विभागातील सर्व ४५ साखर कारखाने १९ मार्च अखेर बंद झाले आहेत. राज्यातील एकूण १७२ साखर कारखान्यांनी आपला गाळप हंगाम समाप्त केला आहे.

पुणे विभागातील २४, अहिल्यानगर विभागातील २०, छत्रपती संभाजीनगर विभागातील १८, नांदेड विभागातील २४, तसेच अमरावती विभागातील एका कारखान्याचा समावेश आहे. सध्या २८ साखर कारखाने सुरू असले, तरी त्‍यांचा उसासाठी झगडा कायम आहे. दरवर्षी कारखान्यांच्या हंगाम समाप्‍तीवेळी कारखाना पातळीवर जल्लोष असतो.

Sugar Industry
Sugar Industry : साखरेची कडू मात्रा

यंदा मात्र प्रत्येक कारखान्याला नियोजित गाळपापेक्षा दोन ते अडीच लाख टनांचा फटका बसला. अगदी मातब्बर कारखानेही यातून सुटले नाहीत. दोन ते अडीच लाख टन कमी गाळप झाल्याने याचा विपरीत परिणाम कारखान्यांच्या अर्थकारणावर होणार आहे. केवळ कारखानेच नव्हे तर शेतकऱ्यांनाही उत्पादन घटीचा मोठा तोटा सहन करावा लागत असल्याचे चित्र अंतिम टप्प्यातही कायम आहे. एकरी दहा ते पंधरा टनांपर्यंत उत्पादन घटल्याने ऊस उत्पादकांत मोठी नाराजी आहे.

यामुळे अनेक कारखान्यांमध्ये कोणताही समारंभ न करता गुपचूप हंगाम समाप्ती झाल्याचे चित्र आहे. मागील हंगामात याच काळात २०७ साखर कारखाने सुरू झाले होते. यात १०३ सहकारी तसेच १०४ खासगी कारखान्यांचा समावेश होता. या कारखान्यांनी १०२९.९८ लाख टन उसाचे गाळप करून १०४ लाख टन साखरेचे उत्पादन केले होते. राज्याचा एकूण सरासरी साखर उताऱ्याचा दर सुमारे १०.१६ टक्के इतका होता. एकूण १०३ साखर कारखान्यांनी गाळप हंगाम समाप्त केला होता. यंदा साखर उताराही घटत ९.४५ टक्के इतका झाला आहे.

Sugar Industry
Sugar Industry Crisis: ‘शॉर्ट मार्जिन’मुळे; साखर कारखाने अडचणीत!

जून ते ऑक्‍टोबरपर्यंत राज्यातील ऊस पट्ट्यात जोरदार पाऊस झाला. हंगाम सुरू होण्‍याअगोदर पाऊस होता. पाण्याचा निचरा न झाल्याने उसाची वाढ खुंटली. तसेच अतिपाण्याचा परिणाम अंतिम टप्प्‍यातील ऊसवाढीवर होऊन उत्पादन घटले.

विभाग हंगाम घेतलेले कारखाने बंद कारखाने साखर उत्पादन (लाख टन)

कोल्हापूर ४० ४० २२

पुणे ३१ २४ १९

सोलापूर ४५ ४५ १०

अहिल्यानगर २६ २० १०

छ. संभाजीनगर २२ १८ ६.५०

नांदेड २९ २४ ९.४

अमरावती ४ १ ०.९

नागपूर ३ ० १

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com