Sugarcane Crushing Season : रावळगाव कारखान्याच्या गळीत हंगामाची सांगता

Sugarcane Season 2025 : रावळगाव कारखाना अध्यक्ष बबनराव गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी पुन्हा ताकदीने सुरू केल्यानंतर या भागाला ऊसशेतीत पुन्हा नवी दिशा मिळाली आहे.
Ravalgaon Sugar Factory
Ravalgaon Sugar FactoryAgrowon
Published on
Updated on

Nashik News : स्पायका ग्रीन एनर्जी अँड ॲग्रो प्रा. लि. संचलित एस. जे. शुगर रावळगाव साखर कारखान्याच्या गळीत हंगामाची सांगता शेतकरी संघटनेचे नेते शेखर पवार यांच्या हस्ते गव्हाण व शेवटच्या ऊस भरलेल्या गाड्यांचे पूजन करून झाली. रावळगाव कारखान्यामुळे गाव व परिसरातील बेरोजगारांच्या हाताला काम मिळाले. रोजगार वाढल्याने अर्थकारण वाढले. कारखान्याने उसाला चांगला दर दिल्याची भावना श्री. पवार यांनी व्यक्त केली.

रावळगाव कारखाना अध्यक्ष बबनराव गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी पुन्हा ताकदीने सुरू केल्यानंतर या भागाला ऊसशेतीत पुन्हा नवी दिशा मिळाली आहे. विविध अडचणींवर मात करत कारखान्याने गेल्या वषपिक्षा या वर्षी अधिक उसाचे गाळप केले.

Ravalgaon Sugar Factory
Sugarcane Crushing Season : मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांत फक्त तीन साखर कारखाने सुरू

ऊस लागवडीसाठी शेतकरी मेळावे घेतले जात आहेत. शेतकऱ्यांना उसाचे बेणे वाटप सुरू करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी एकूण क्षेत्रापैकी २५ टक्के क्षेत्रावर ऊस लागवड करावी, असे आवाहन केले.

Ravalgaon Sugar Factory
Sugarcane FRP : एकरकमी एफआरपी निर्णयाचे नांदेडला स्वागत

हंगामासाठी सहकार्य करणाऱ्या ऊस उत्पादक शेतकरी, ऊस तोडणी वाहतूकदार ठेकेदार, शासकीय अधिकारी, कारखान्यातील कर्मचाऱ्यांचे व्यवस्थापनाने आभार मानले. ऊस वाहतूक करणाऱ्यांना व महिलांना शेखर पवार, कारखान्याचे अध्यक्ष बबनराव गायकवाड, उपाध्यक्ष नानासाहेब आंबेकर, संचालक कुंदन चव्हाण आदींच्या हस्ते शाल, श्रीफळ, साडी देऊन सन्मानित करण्यात आले. उन्मय चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. कुंदन चव्हाण यांनी आभार मानले. सरव्यवस्थापक बी. एन. पवार उपस्थित होते.

हंगामाची स्थिती

एकूण गाळप (टन) ११४७२४.०१२

एकूण साखर (क्विंटल) १०९९९५.००

एकूण रिकव्हरी ९.५४ टक्के

रावळगाव कारखान्याचे सलग दोन गळीत हंगाम यशस्वी झाले. कारखाना कार्यक्षेत्रात ऊस लागवडीसाठी शेतकऱ्यांचे मेळावे घेऊन बेणे उपलब्ध करून दिले जात आहे. आगामी हंगामाची तयारी सुरू झाली आहे. पुढील हंगामात विक्रमी गाळप होईल. हंगामासाठी सर्व घटकांचे सहकार्य लाभले.
- बबनराव गायकवाड, अध्यक्ष, रावळगाव कारखाना

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com