Sugarcane Crushing Season : मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांत फक्त तीन साखर कारखाने सुरू

Sugarcane Season 2025 : छत्रपती संभाजीनगर येथील प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयांतर्गत येत असलेल्या नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या पाच जिल्ह्यांतील २२ कारखान्यांनी यंदाच्या ऊस गाळप हंगामात सहभाग नोंदविला.
Sugar Factory
Sugarcane SeasonAgrowon
Published on
Updated on

Chh. Sambhajinagar News : मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तीन जिल्ह्यांतील केवळ तीन कारखान्यांचे ऊस गाळप आताच्या घडीला सुरू आहे. तीनही जिल्ह्यांतील उर्वरित १६ कारखान्यांचा ऊस गाळप हंगाम आटोपला आहे.

छत्रपती संभाजीनगर येथील प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयांतर्गत येत असलेल्या नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या पाच जिल्ह्यांतील २२ कारखान्यांनी यंदाच्या ऊस गाळप हंगामात सहभाग नोंदविला.

त्यामध्ये नंदुरबारमधील दोन, जळगावमधील एक, छत्रपती संभाजीनगर मधील सात, जालन्यातील चार व बीडमधील आठ कारखान्यांचा सहभाग आहे. आतापर्यंत नंदुरबार व जळगाव मधील तिन्ही कारखान्यांचा हंगाम फेब्रुवारीच्या मध्यान्हात व शेवटी आटोपला आहे.

छत्रपती संभाजीनगर मधील सात पैकी सहा कारखान्यांचा हंगाम फेब्रुवारीच्या शेवटी व मार्चमध्ये आटोपला आहे. जालना मधील दोन कारखान्यांचा हंगाम अनुक्रमे ११ व १५ मार्च रोजी आटोपला. बीड जिल्ह्यातील सर्व आठही कारखान्यांचा गाळप हंगाम फेब्रुवारी व मार्च महिन्यात आटोपला असल्याची माहिती प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाकडून देण्यात आली.

Sugar Factory
Sugarcane Crushing Season : मराठवाड्यासह खानदेशातील चौदा कारखान्यांचे गाळप आटोपले

८० लाख ३१ हजार ५४० टन उसाचे गाळप

मराठवाडा व खानदेशातील ५ जिल्ह्यांतील २२ कारखान्यांनी १८ मार्चपर्यंत ८० लाख ३१ हजार ५४० टन उसाचे गाळप केले. या गाळपातून सरासरी ८ टक्के साखर उताऱ्याने ६४ लाख २८ हजार ६३० क्विंटल साखरेचे उत्पादन केले.

Sugar Factory
Sugarcane Crushing : सोलापूर जिल्ह्यातील ऊस गाळपात ४० तर उत्पादनात ४६ टक्के घट

यामध्ये सहकारी १३ कारखान्यांनी ३४ लाख ५८ हजार ३२७ टन उसाचे गाळप करत सरासरी ७.८३ टक्के साखर उताऱ्याने २७ लाख ७ हजार ८९० क्विंटल साखरेचे उत्पादन केले. दुसरीकडे खासगी ९ कारखान्यांनी ४५ लाख ७३ हजार २१३ टन उसाचे गाळप केले या कारखान्यांनी सरासरी ८.१४ टक्के साखर उताऱ्याने ३७ लाख २० हजार ७४० क्विंटल साखरेचे उत्पादन केल्याची माहिती प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाकडून देण्यात आली.

जिल्हानिहाय ऊस गाळप व साखर उत्पादन (१८ मार्चपर्यंत)

नंदुरबार : जिल्ह्यातील दोन कारखान्यांनी ७ लाख ८८ हजार १२० टन उसाचे गाळप करत पाच लाख ९०० क्विंटल साखरेचे उत्पादन केले या कारखान्यांचा सरासरी साखर उतारा ६.३६ टक्के इतका राहिला.

जळगाव : जिल्ह्यातील एका कारखान्याने एक लाख ४ हजार ३२९ टन उसाचे गाळप करत सरासरी १०.०७ टक्के साखर उताऱ्याने १ लाख ५ हजार ५० क्विंटल साखरेचे उत्पादन केले.

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील आठ कारखान्यांनी १८ लाख ५२ हजार २१४ टन उसाचे गाळप करत सरासरी १०.१६ टक्के साखर उताऱ्याने १८ लाख ८० हजार ९८९ क्विंटल साखरेचे उत्पादन केले.

जालना : जिल्ह्यातील चार कारखान्यांनी २१ लाख ९ हजार ८१६ टन उसाचे गाळप करत सरासरी ८.४३ टक्के साखर उताऱ्याने १७ लाख ७९ हजार ५० क्विंटल साखरेचे उत्पादन केले.

बीड : जिल्ह्यातील आठ कारखान्यांनी ३१ लाख ७७ हजार ६१ टन उसाचे गाळप करत सरासरी ६.८१ टक्के साखर उताऱ्याने २१ लाख ६२ हजार ६४१ क्विंटल साखरेचे उत्पादन केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com