MIDAS Technology Agrowon
ॲग्रो विशेष

Water Management : प्रभावी पाणी व्यवस्थापन सांगणारी दोघा मित्रांची कंपनी

मुकुंद पिंगळे

Success Story of Water Management : नाशिक स्थित पियुष भांडारकर या युवकाने येथील के.के.वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयातून प्रॉडक्शन इंजिनिअरिंग विषयातील पदवी घेतली. सन २०२० मध्ये तिसऱ्या वर्षात नाशिक येथील ‘टीसीएस फाउंडेशन’ च्या पाण्याविषयी एका सामाजिक प्रकल्पात काम करण्यासाठी त्याला फेलोशिप मिळाली.

या प्रकल्पात ठाणे येथील वृषभ रविचंद्रन या इंजिनिअर तरुणाचाही समावेश होता. यावेळी सहा महिने नाशिक व पुणे जिल्ह्यातील ३० गावांत भेटी देण्याची संधी दोघांना मिळाली.

स्टार्ट अपची झाली स्थापना

फेलोशिप मधील प्रकल्पात पियुष व वृषभ एकमेकांचे मित्र झाले. गावा-गावांमधील जलसमस्यांची त्यांना जाण आली. पियुषचे मूळ गाव खानदेशात असून तेथील जलसंकटाची तीव्रताही त्याच्या लक्षात आलीच होती. तंत्रज्ञान विकास व त्याचा वापर करून पाणीसमस्या सोडवण्याचा प्रयत्न करायचा असे दोघांनी ठरवले. भूजलपातळी, भूपृष्ठीय पाणी, पाण्याचे बाष्पीभवन, मातीची आर्द्रता, गावातील उपलब्ध पाणीसाठा अशा माहितीचे उपग्रह, शासकीय स्रोत व क्षेत्रीय सर्वेक्षण करून संकलन असा मोठा अनुभव त्यांना घेता आला.

हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर दोघांनी याच संकल्पनेवर पुढील कार्य करण्यासाठी कंपनी स्थापन करायचे ठरवले. जलसुरक्षा व लोकसहभागातून विकास’ हा विचार त्यामागे पक्का होता. सन २०२०- २१ च्या सुमारास ‘एकत्वम इनोव्हेशन’ या स्टार्टअप कंपनीची स्थापना केली. त्या अंतर्गत दोघा मित्रांनी मिडास ( मॉडेल ऑफ इंटरॅक्टिव्ह डिसिजन सिम्युलेटर) ही तंत्रज्ञान प्रणाली विकसित केली आहे. त्या आधारे गाव स्तरावरील पाण्याचे व्यवस्थापन प्रभावीपणे करणे शक्य होणार आहे.

‘मिडास’ ची कार्यपद्धती व साध्य बाबी

उपग्रहाद्वारे, शासकीय तसेच अन्य स्रोतांच्या माध्यमातून पाण्याच्या अनुषंगाने संपूर्ण ‘डाटा’ संकलित केली जाते. ही स्वयंचलित प्रणाली आहे. पाण्याचे प्रभावी नियोजन एका क्लिकवर करता येते. -एकत्रित माहितीचे विश्लेषण होते. तपशील मांडले जातात.

ग्रामीण भागातील जलस्रोत, त्यांच्या पातळीचे मोजमाप, उपलब्धता, घट व अचूक वापर त्याद्वारे सांगता येतो.

सूक्ष्म सिंचन पर्याय व त्यासाठी लागणारी पाण्याची गरज स्पष्ट होते.

जमिनीतील खडकांचे प्रकार अभ्यासून पाण्याचे स्रोत व साठवणूक संबंधीची रचना (स्ट्रक्चर) सांगता येते.

ग्रामपंचायत स्तरावर ग्राम पाणी नियोजन समितीला या तंत्रज्ञानाची मोठी मदत होऊन सर्व माहितीच्या आधारे जलआराखडा तयार करता येतो. उपलब्ध पाणी, पिकाचे गावातील एकूण क्षेत्र लक्षात घेऊन पाणीवापराचा सल्ला देता येतो.

शेतकऱ्यांना भूजल पातळीनुसार हंगामी पाणी ताळेबंद काढता येतो.

तंत्रज्ञानाचा झाला प्रसार

ग्रामपंचायती व गावातील स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने या तंत्रज्ञानाचा प्रसार करणे शक्य असल्याचे या कंपनीचा संस्थापक पियुष म्हणतो. महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तेलंगण, गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान, झारखंड, कर्नाटक आदी राज्यांत व १५० गावांमध्ये या स्टार्ट अप कंपनीचे कामकाज सुरू आहे.

यात आठ सामाजिक व अशासकीय संस्थांची भागीदारी आहे. जवळपास ३०० हून अधिक विहिरींचे व ७५० पर्यंत (तलाव, परकोलेशन टॅंक आदी) जलस्रोतांचे सर्वेक्षण झाले आहे. दोन वर्षांत कामाचा विस्तार होत असताना १३.२ दशलक्ष पाणी बचत करण्याची क्षमता विकसित झाली आहे. सुमारे २०० शेतकऱ्यांना पीकपद्धतीबाबत मार्गदर्शन मिळाले आहे. महाराष्ट्रात धाराशिव, तुळजापूर, नंदूरबार, रायगड या ठिकाणी प्रकल्प राबवले आहेत.

कंपनीच्या टीममध्ये आठ जण कार्यरत असून चार सल्लागारही आहेत. पाण्याच्या अनुषंगाने निर्माण होणारे धोके व त्यासाठी मूल्यांकन करून भविष्यकालीन पीक पद्धती तसेच नागरी, औद्योगिक व शेती यासंबंधी पाणीवापर निर्णय घेण्यासाठी या तंत्रज्ञान प्रणालीचा फायदा होत आहे. अनेक ठिकाणी तो फायदेशीर ठरला देखील आहे. त्यामुळे टाटा ट्रस्टच्या ‘कोस्टल सॅलिनिटी प्रिव्हेन्शन सेल, सेंटर ऑफ मायक्रो फायनान्स, डेव्हलपमेंट सपोर्ट सेंटर, वॉटरएड, विजयवाहिनी चॅरिटेबल फाउंडेशन आदी संस्थांनी ही प्रणाली स्वीकारली आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवर सन्मान : सन २०२२ मध्ये

कोपनहेगन (डेन्मार्क) येथे झालेल्या ‘इंटरनॅशनल वॉटर काँग्रेस’ मध्ये सहभागी होण्याची संधी पियुष व वृषभ यांना मिळाली. यात ‘इंटरनॅशनल वॉटर असोसिएशन आणि डेन्मार्क टेक्निकल युनिव्हर्सिटी यांच्यातर्फे मिडास प्रणाली विकसित केल्याबद्दल भारतातील नवोन्मेषक म्हणून त्यांना बहुमान मिळाला. आंतरराष्ट्रीय जल संघटनेच्या तज्ज्ञांकडूनही ‘मोस्ट प्रॉमिसिंग सोल्यूशन ग्लोबल ॲवॉर्ड प्रदान करण्यात आले. सन २०२३ मध्येही हिंदुस्तान युनिलिव्हर फाउंडेशन व विलग्रो यांच्याकडून दोघांचा सन्मान झाला. सिंगापूर येथेही पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. वाटचालीत ‘टीसीएस फाउंडेशन’ चे संशोधन प्रशिक्षक संदीप शिंदे, राज्याच्या लाभक्षेत्र विकास विभागाचे सचिव डॉ.संजय बेलसरे, जेव्हीआर मूर्ती आदींचे मार्गदर्शन लाभले आहे.

तांत्रिक व माहिती तंत्रज्ञान, पाण्याविषयी प्रबोधन या सर्व पद्धतींचे एकत्रीकरण आवश्यक आहे. त्यातूनच गावनिहाय जल व्यवस्थापन करून शाश्वत उपाय करणे शक्य होईल. तांत्रिक नवकल्पनांना सामुदायिक कौशल्याची जोड दिल्यास नियोजन अधिक फायदेशीर ठरते. त्यासाठी शासन व सामाजिक संस्थांचे पाठबळ महत्त्वाचे आहे.

पियुष भांडारकर ९८३४०११८७३,

संस्थापक, ‘एकत्वम इनोव्हेशन’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Crop : वाढलेल्या सोयबीनमध्ये शेंगांचा शोध

Agricos Welfare Society : ‘कृषी’च्या विद्यार्थ्यांकडून सेवाभावी संस्थेला मदत

E-Peek Pahani : छप्पन टक्के शेतकऱ्यांनी नोंदविली ई-पीकपाहणी

Crop Damage Compensation : नांदेडमधील शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई

Integrated Agriculture : एकात्मिक शेती पद्धतीच्या यशस्वी मॉडेलचा प्रसार व्हावा

SCROLL FOR NEXT