Dharashiv News : जिल्ह्यातील कळंब व वाशी तालुक्यात गुरुवारी झालेल्या पावसाने हाहाकार माजवला. मुसळधार पावसाने नदीकाठच्या शेतकऱ्यांचे कष्ट पाण्यात वाहून गेले. मांजरा नदीला पूर आल्यामुळे नदीकाठच्या दुतर्फा एक किलोमीटर अंतरातील पिके पाण्याखाली जाऊन हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले..तेरणा नदीलाही पुर आला असून माकणी (ता. लोहारा) येथील निम्न तेरणा धरण भरले. शनिवारी (ता. १६) सकाळी धरणाचे दहा उघडून नदीपात्रात विसर्ग सुरू झाला. धनेगाव (ता. केज) येथील मांजरा धरणही दोन दिवसात काठोकाठ भरत आले असून कोणत्याही क्षणी धरणातून विसर्ग सुरु होण्याची शक्यता आहे..Monsoon Heavy Rain: राज्यात जोरदार पावसाचा अंदाज; विदर्भ, कोकणात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता.तावरजा (ता. लातूर) मध्यम प्रकल्पातही काही वर्षाच्या इतिहासात ऑगस्टमध्येच मुबलक पाणीसाठा झाला असून या प्रकल्पातूनही पाण्याचा विसर्ग सुरु होण्याची शक्यता आहे. लातूर व धाराशिव जिल्ह्यात गुरुवारी सायंकाळपासूनच जोरदार पावसाला सुरवात झाली. रात्रभर सुरू असलेल्या मुसळधार पावसाने तेरणा व मांजरा नदीला पूर आला. मांजरा नदीला मिळणाऱ्या वाशिरा नदीलाही पुर आल्यामुळे नदीकाठच्या शेतांमध्ये पाणी शिरले व उभ्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. .अनेक वर्षानंतर इटकूर ते पारा रस्त्यावरील वाशीरा नदीच्या मोठ्या पुलावरून पाणी वाहत होते. त्यामुळे या मार्गावरील वाहतुक गुरुवारी रात्री दीड ते सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत वाहतूक ठप्प झाली होती. तेरणा नदीला आलेल्या पुराने कसबे तडवळे ते खामगाव दरम्यान तर ढोकी ते आरणी दरम्यान असलेल्या नदीवरील पुलावरुन पाणी वाहू लागले. .यामुळे दोन्ही रस्त्यावरील वाहतुक शुक्रवारी (ता. १५) सकाळपर्यंत ठप्प होती. खोंदला (ता. कळंब) येथील शेतकरी सुब्राव शंकर लांडगे (वय ६५) हे पुरात वाहून गेले असून आपत्ती दलाच्या पथकाला त्यांचा अद्याप त्याचा शोध लागलेला नाही.वाशी तालुक्यात ढग फुटीसृद्श्य पाऊस झाल्याने या भागातून उगम असलेल्या मांजरा व वाशीरा नदीला मोठे पाणी आले. अजूनही नदीतून पाणी मोठ्या प्रमाणात वाहत असून दोन दिवसात मांजरा धरण भरत आले आहे. .गुरुवारी सकाळी मांजरा धरणात ६३ दलघमी पाणी होते. दोन दिवसात ९२ दलघमी पाणी आले असून शनिवारी दुपारी बारा वाजता धरणात ८७ टक्के पाणी होते. पावसामुळे धाराशिव, कळंब व वाशी तालुक्यातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे..Vidarbha Heavy Rain: विदर्भात पावसामुळे हाहाकार.कृषिमंत्री धाराशिवच्या दौऱ्यावरपावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शनिवारी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान शुक्रवारी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी वाशी तालुक्यात तर आमदार राणा जगजितसिंह पाटील व आमदार कैलास घाडगे पाटील यांनी कळंब व धाराशिव तालुक्यात पाहणी करुन शेतकऱ्यांना धीर दिला. .माजीमंत्री आमदार अमित देशमुख यांनी भुसणी येथील उच्चस्तरीय बंधाऱ्याची पाहणी करुन गेट दुरुस्तीच्या सुचना दिल्या. पावसामुळे नदीकाठच्या शेतांतील पिकांचे नुकसान झाले असून पाण्याच्या प्रवाहमुळे सौर ऊर्जा संच वाहून जाण्यासह पिकेही पाण्याखाली आली आहेत. नुकसानीचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, अशी मागणी लोकप्रतिनिधींनी केली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.