Sangli News : जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान वापरण्यास प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा बँकेच्या वतीने ए-आय तंत्रज्ञानासाठी (कृत्रिम बुद्धिमत्ता) ९ हजार रुपये अनुदान देण्यात येणार असल्याची घोषणा बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी केली. .येथील धनंजय गार्डन येथे बुधवारी (ता. १३) सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची ९८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या वेळी बँकेच्या उपाध्यक्ष जयश्री पाटील, संचालक मोहनराव कदम, संग्रामसिंह देशमुख, महेंद्र लाड, सुरेश पाटील, अमोल बाबर, तानाजी पाटील, वैभव शिंदे, राहुल महाडीक यांच्यासह सर्व संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ आदी उपस्थित होते. याप्रसंगी यंदा १०० टक्के वसुली केलेल्या सोसायटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सचिवांचा सत्कार या वेळी करण्यात आला..AI In Farming : अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी ‘एआय’ प्रकल्प.अध्यक्ष श्री. नाईक यांनी सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना सविस्तर उत्तर देताना म्हणाले, जिल्हा मध्यवर्ती बँक ही राज्यातील एक नंबरची बँक असून शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत आहे. शेतकऱ्यांना आर्थिक सक्षम करण्यासाठी प्रयत्नशील आहे. थकबाकीदार शेतकरी व सभासद संस्था यांना दिलासा देत पुन्हा एकदा बँकेच्या वतीने ओटीएस योजना राबविणार आहे..ते म्हणाले, की शेतीचे उत्पादन वाढविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. ए-आय तंत्रज्ञानासाठी २५ हजारांचा खर्च येतो. त्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडून ९ हजार २५० रुपये, साखर कारखाने ६ हजार ७५० रुपये देणार आहे. .Ai in Agriculture: द्राक्ष शेतीतही ‘एआय’ला चालना देणार : पवार.शेतकऱ्यांना ९ हजार रुपये हिश्श्याची रक्कम भरावी लागणार आहे. शेतकरी हिश्श्याचे ९ हजारांचे अनुदान न परत फेडीसाठी देणार आहे. थकबाकीदार शेतकरी व सभासद संस्था यांना दिलासा देत पुन्हा एकदा बँकेच्या वतीने ओटीएस योजना राबविणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले..सभेतील महत्त्वाचे मुद्देओटीएस योजना पुन्हा सुरू करणारओटीएसमध्ये सहभागी होण्यासाठी मार्च २०२६ पर्यंत मुदतवाढ१० हजार कोटींच्या ठेवींचे उद्दिष्टपीक कर्जात २०० कोटींनी वाढशेतकरी अपघात विमा योजनेतून १०० शेतकऱ्यांच्या कुटुंबांना लाभकर्जमाफीची शक्यता नाहीजिल्हा बँकेच्या वार्षिक सभेत सभासदांनी कर्जमाफीबाबत प्रश्न उपस्थित केला. याला उत्तर देताना श्री. नाईक म्हणाले, की येणाऱ्या दोन वर्षांत कर्जमाफीची शक्यता नाही. पुढे महत्त्वाची कोणतीही निवडणूक नसल्याचे कर्जमाफी होणार नाही. त्यामुळे कर्ज थकवू नका..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.