Water Conservation : जलसंधारणातून रुखनखेड्याला बळ

Water Conservation System : चोपडा तालुक्यातील रूखनखेडा गावात जलसंधारणाच्या कामांमुळे केळीसह बागायती शेतीला चांगले बळ मिळाले आहे.
Water Conservation
Water ConservationAgrowon

Jalgaon News : चोपडा तालुक्यातील रूखनखेडा गावात जलसंधारणाच्या कामांमुळे केळीसह बागायती शेतीला चांगले बळ मिळाले आहे. लोकसहभागातून नाला खोलीकरण तसेच रुंदीकरणाचे काम झाले आहे.

यामुळे गावशिवार बारमाही हिरवे झाले आहे, भूगर्भातील जलसाठे टिकून आहेत. जलसंधारणाच्या कामासाठी विठ्ठल अॅफ्रो - बीसीआय, चोपडा येथील श्री गोवर्धन संस्था आणि विरवाडे (ता. चोपडा) येथील डॉ.प्रशांत राजपूत, नाम फाउंडेशन यांची मदत झाली आहे.

Water Conservation
Water Conservation : विहीर, आडांच्या पुनरुज्जीवनासाठी सरसावले दहा गावांचे विद्यार्थी

गावात काही वर्षांपूर्वी पाणी टंचाई होती. भूगर्भातील जलसाठे कमी झाले होते. यामुळे परिसरातील केळी व अन्य पिकांची बागायती शेती यामुळे संकटात आली. हे संकट दूर करण्यासाठी ग्रामस्थ एकत्र आले. गावाच्या पश्चिमेला वघाळ नाला आहे. येथे जलसंधारणाच्या कामांवर विचार सुरू झाला.

Water Conservation
Water Conservation : जलसंधारणातून वेणी खुर्द लागवसला विकासाचा नवा मंत्र

नाल्यातून उपलब्ध झालेला गाळ परिसरातील शेतरस्ते, बांधबंदिस्ती यासाठी वापरण्यात आला. जमीन सुपीकतेसही यातून मदत झाली. अडीच लाख रुपये निधी यासाठी खर्च आला. परिसरातील केळी, कापसाची लागवड वाढली आहे. ग्रामस्थांचे वित्तीय स्रोतही यातून वाढण्यास मदत झाली. आता जलसाठे टिकून आहेत.

बारमाही बागायती असून, नजीकच्या एक किलोमीटर परिघातील कूपनलिकांची पाणीपातळी वाढली. शेतीसाठी हक्काचे पाणी आल्याने भाजीपाला शेती वाढली. सुमारे २५० हेक्टर क्षेत्रास याचा लाभ मिळत आहे. पाणी समितीचे सदस्य शेतकरी डॉ.सुभाष देसाई, डॉ.रवींद्र निकम, अजय हिंमत पाटील, मोहन पाटील, सुशील धनंजय पाटील, छन्नू पाटील आदींचे या उपक्रमासाठी सहकार्य मिळाले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com