Watermelon Farming : पीक पद्धती बदलत केली कलिंगड लागवड

Article by Krushna Jomegaonkar : पार्डी (ता. अर्धापूर) या इसापूर (पेनगंगा) प्रकल्पावर बारमाही बागायती असलेल्या भागामध्ये केळी, ऊस, हळद यासह भाजीपाला, गहू, ज्वारी आदी पिकांचे उत्पादन शेतकरी घेतात. मात्र काही वर्षांपासून येथील शेतकऱ्यांचा कलिंगड लागवड करण्याकडे कल वाढला आहे.
Watermelon Farming
Watermelon Farming Agrowon
Published on
Updated on

Watermelon Management :

शेतकरी नियोजन

पीक : कलिंगड

शेतकरी : प्रवीण विठ्ठलराव देशमुख

गाव : पार्डी, ता. अर्धापूर, जि. नांदेड

एकूण शेती : ४० एकर

कलिंगड लागवड : सात एकर

पार्डी (ता. अर्धापूर) या इसापूर (पेनगंगा) प्रकल्पावर बारमाही बागायती असलेल्या भागामध्ये केळी, ऊस, हळद यासह भाजीपाला, गहू, ज्वारी आदी पिकांचे उत्पादन शेतकरी घेतात. मात्र काही वर्षांपासून येथील शेतकऱ्यांचा कलिंगड लागवड करण्याकडे कल वाढला आहे.

Watermelon Farming
Watermelon Processing : अशी तयार करा कलिंगडापासून जॅम, टॉफी

याच गावातील प्रवीण विठ्ठलराव देशमुख यांची ४० एकर शेती. त्यात केळी लागवड ११ एकर, गहू दोन एकर, हळद ९ एकर आणि पपई तीन एकरांवर आहे. केळी पिकाच्या काढणीनंतर हरभरा लागवडीचे नियोजन प्रवीण देशमुख यांनी केले होते. परंतु दरम्यानच्या काळात अवेळी पडलेल्या पावसामुळे पीक पद्धतीत बदल करत त्यांनी सात एकरांवर कलिंगडाची लागवड केली. केवळ अडीच महिन्यांत खर्च वजा जाता चांगला फायदा राहिल्याचे ते सांगतात. लागवड नियोजन ः

केळी कापणीनंतर केळीची झाडे शेतातच छाटून ती जमिनीत मिसळून दिली. जेणेकरून केळी पिकाचे अवशेष कुजून त्याचे खत तयार होऊन जमिनीला फायदा होईल.

त्यानंतर ट्रॅक्टरच्या साह्याने शेतीची मशागत करून घेतली. कलिंगड लागवडीसाठी पाच फूट अंतराचे बेड तयार केले. त्यावर ठिबकच्या नळ्या अंथरून बेड चांगले भिजवून घेतले.

वाफसा आल्यानंतर बेडवर रासायनिक खतांचे बेसल डोस दिले. त्यात डीएपी ५० किलो, पोटॅश ५० किलो, अमोनिअम सल्फेट ५० किलो व सूक्ष्म अन्नद्रव्ये ५ किलो प्रमाणे एकरी मात्रा दिली. खतमात्रा बेडवर दिल्यानंतर एकरी तीन किलो प्रमाणे ट्रायकोडर्माचा वापर केला.

बेड तयार झाल्यावर त्यावर मल्चिंग पेपर टाकून घेतला. त्यानंतर पुन्हा एकदा ठिबकद्वारे बेड भिजवून घेतले.

कलिंगड लागवडीची पूर्वतयारी झाल्यावर १७ डिसेंबर ते २१ डिसेंबर या कालावधीत एक फूट बाय दीड फूट अंतरावर कलिंगड बियांची टोकण केली.

Watermelon Farming
Watermelon Food Processing : कलिंगडापासून रस, सरबत आणि सिरप

लागवड करण्यापूर्वी बियाण्याला शिफारशीप्रमाणे रासायनिक आणि जैविक घटकांची बीजप्रक्रिया करून घेतली.

लागवडीनंतर ठिबकच्या माध्यमातून प्रतिदिन २ तास प्रमाणे सिंचन करण्याचे नियोजन केले. त्यामुळे रोपांची उगवण चांगली झाली.

वेलींची चांगली वाढ होऊ लागल्यानंतर नागअळी तसेच बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून रासायनिक कीडनाशके आणि बुरशीनाशकांची फवारणी वापर केला.

पीक ३२ ते ३४ दिवसांचे झाल्यानंतर पिकाची पाण्याची वाढती गरज लक्षात घेऊन सिंचनाचा कालावधी वाढविला. प्रतिदिन साधारण ४ तास सिंचन करण्यात आले.

वातावरणाचा अंदाज घेऊन कलिंकड लागवडीची कीड-रोगांच्या प्रादुर्भावासाठी सातत्याने पाहणी करत आहे. आवश्यकतेनुसार रासायनिक बुरशीनाशके व कीडनाशकांची फवारणी केली जात आहे.

योग्य व्यवस्थापन केल्यानंतर साधारण ७२ दिवसांत कलिंगड काढणीला आले. साधारणपणे ‘ग्रेड-ए’ कलिंगडाचे १५९ टन, तर ‘ग्रेड-बी’चे ३४ टन कलिंगड उत्पादन मिळाले आहे. यापैकी ‘ग्रेड ए’ कलिंगडास प्रतिटन सरासरी बारा हजार रुपये तर ‘ग्रेड बी’च्या कलिंगडाला सरासरी सहा हजार रुपये दर मिळाल्याचे प्रवीण देशमुख यांनी सांगितले.

खत व्यवस्थापन :

रोपांची उगवण झाल्यानंतर १८ दिवसांनी ठिबकद्वारे विद्राव्य खतांचा पहिला डोस दिला. यात १९:१९:१९ एकरी ७ किलो, मॅग्नेशिअम सल्फेट एकरी ७ किलो प्रमाणे दिले.

त्यानंतर तीन दिवसांनी विद्राव्य खतांचा दुसरा डोस दिला. यात १२:६१:० हे खत एकरी ५ किलो प्रमाणे दिले.

पीक साधारण ३५ दिवसांचे झाल्यानंतर ठिबकद्वारे खताचा तिसरा डोस दिला. यात १३:४०:१३ एकरी ५ किलो दिले. त्यानंतर तीन दिवसांनी १३:०:४५ एकरी पाच किलो प्रमाणे मात्रा दिली. याच कालावधीत पुन्हा ट्रायकोडर्मा ३ किलो प्रति एकर प्रमाणे ठिबकद्वारे वापर केला.

फळधारणेच्या वेळी मॅग्नेशिअम सल्फेट ५ किलो अधिक वाढवर्धक देण्यात आले. फळाचा दर्जा सुधारण्यासाठी ०:५२:३४ एकरी ५ किलो प्रमाणे दिले. यानंतर फळाची गोडी वाढण्यासाठी पोटॅशिअम शोनाइट दिले.

प्रवीण देशमुख, ९५१८५३४७३६

(शब्दाकंन : कृष्णा जोमेगावकर)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com