Yeldari Water Level Agrowon
ॲग्रो विशेष

Yeldari Dam : येलदरी धरणात ४१.०६ टक्के, तर ‘सिद्धेश्वर’मध्ये ७५ टक्के पाणीसाठा

Team Agrowon

Parbhani News : परभणी व हिंगोली जिल्ह्यांच्या सीमेवरील पूर्णा नदीवरील येलदरी धरणामध्ये बुधवारी (ता. ६) सकाळी ८ वाजता ४५७.१९७ एमएमक्यूब (४१.०६ टक्के) तर त्याखालील सिद्धेश्वर धरणामध्ये ६१.२९७ एमएमक्यूब (७५.७१ टक्के) जिवंत पाणीसाठा शिल्ल्क होता. बाष्पीभवन, उपसा, सिद्धेश्वर धरणात पाणी सोडण्यात आल्यामुळे येलदरी धरणातील पाणीसाठ्यात मोठी घट झाली आहे.

येलदरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात २०२३ च्या पावसाळ्यात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी राहिले आहे. त्यामुळे पाण्याची आवक कमी असल्यामुळे धरणातील पाण्यासाठ्यात यंदा जेमतेम २.५ टक्के वाढ झाली होती. १ जून २०२३ पासून धरणक्षेत्रात ७०५ मिलिमीटर पाऊस झाला आहे. गतवर्षी (२०२२) एकूण ८८८ मिलिमीटर पाऊस झाला होता.

धरणाच्या जलाशयात १ जून २०२३ एकूण ९६.०७६ एमएमक्यूब पाण्याची आवक झाली. या धरणातून दररोज जिंतूर शहर पाणीपुरवठा योजनेसाठी ०.००७ एमएमक्यूब, परभणी शहर पाणीपुरवठा योजनेसाठी ०.०२० एमएमक्यूब, सेनगाव पाणीपुरवठा योजनेसाठी ०.००२ एमएमक्यूब पाणी वापर आहे. उपसा सिंचन योजनेद्वारे ०.००३ एमएमक्यूब वापर झाला.

बाष्पीभवनाद्वारे ०.२६१ एमएमक्यूब व इतर व्यय ०.०३१ एमएमक्यूब आहे. गतवर्षीच्या पावसाळ्यात पाणलोट क्षेत्रातील जोरदार पावसामुळे येलदरी धरणाच्या खालच्या भागातील पूर्णा नदीवरील सिद्धेश्वर धरण पूर्ण भरले होते. या धरणाच्या कालव्याद्वारे आवर्तने सोडण्यात आली. या धरणात बुधवारी (ता. ६) सकाळी ८ वाजता ६१.२९७ एमएमक्युब (७५.७१) टक्के जिवंत पाणीसाठा शिल्लक होता.

गतवर्षी याच तारखेला या धरणात ४७.९९२ एमएमक्यूब पाणीसाठा होता. धरण क्षेत्रात १ जून २०२३ पासून आजवर ९०३ मिलिमीटर पाऊस झाला आहे. गतवर्षी (२०२२) १२१५ मिलिमीटर पाऊस झाला होता.१ जून २०२३ पासून धरणात २११.१५९ एमएमक्यूब पाण्याची आवक झाली आहे. १ जुलैपासून या धरणाच्या कालव्याद्वारे ९२.०२५ एमएमक्यूब पाणी सिंचनासाठी सोडण्यात आले. पाणीपुरवठ्यासाठी ३.७५० एमएमक्यूब पाणीसाठा आहे. उपसा सिंचनाद्वारे ३.८६० एमएमक्यूब पाणी वापर झाला. बाष्पीभवनाद्वारे ०.१३५ एमएमक्यूब व्यय होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

Soybean Procurement Center : मंचर बाजार समितीमध्ये लवकरच सोयाबीन खरेदी केंद्र

Pune Rain : धरणक्षेत्रांत पावसाच्या जोरदार सरी

National Water Awards : पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांवर महाराष्ट्राची छाप

Greenhouse Project Inaguration : वाण विकासासाठी हरितगृह फायदेशीर : डॉ. पाटील

SCROLL FOR NEXT