Khadakwasla Dam : खडकवासला धरणसाखळीत पाच वर्षांत नीचांकी पाणीसाठा

Khadakwasla Dam Water Storage : पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील चार धरणांमध्ये मागील पाच वर्षांतील नीचांकी पाणीसाठा शिल्लक आहे.
Khadakwasla Dam Pune
Khadakwasla Dam PuneAgrowon

Pune News : पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील चार धरणांमध्ये मागील पाच वर्षांतील नीचांकी पाणीसाठा शिल्लक आहे. आगामी शेतीचे आवर्तन, शहराला आवश्यक असणारे पाणी, बाष्पीभवन या सर्वांचा विचार करून पाण्याचे नियोजन करणे आवश्यक झाले आहे.

मुठा खोऱ्यातील या चारही धरणांची एकूण पाण्याची उपयुक्त क्षमता २९.१५ टीएमसी आहे. सध्या या चारही धरणांत मिळून १५.४५ टीएमसी म्हणजेच ५२.९९ टक्के पाणीसाठा आहे. यंदा जेमतेम झालेल्या पावसामुळे खडकवासला, टेमघर, वरसगाव आणि पानशेत ही चारही धरणे कशीबशी १०० टक्के भरली.

मात्र त्यानंतर परतीच्या पावसाने पाठ फिरविल्याने धरणांत पुन्हा पाणीसाठा जमा झाला नाही. त्यामुळे खडकवासला प्रकल्पात कमी पाणीसाठा आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा हा साठा तीन टीएमसीने (TMC) कमी आहे. त्यामुळे पुढे शहरात पाणीकपात करावी लागण्याची शक्यता आहे.

Khadakwasla Dam Pune
Pune Dam : खडकवासला, कळमोडी धरण शंभर टक्के भरले

गेल्या वर्षी कडक उन्हाळ्यामुळे धरणांमधील पाणीसाठा कमालीचा घटला होता. तसेच पाऊस (Rain) लांबणीवर गेल्याने ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात खडकवासला धरण भरले. यामुळे जुलैमध्ये पाणीकपात (Water Cut) करण्याची वेळ पालिका प्रशासनावर आली होती. सप्टेंबरमध्येही समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे धरणे (Dam) जेमतेमच भरली आहेत.

खडकवासला धरणसाखळीतील पाणीसाठा (टीएमसी)
वर्ष---पाणीसाठा---टक्के
२०२४---१५.४५---५३
२०२३---१८.९२---६४
२०२२---१७.९३---६१
२०२१---२०.६३---७०
२०२०---१८.६४---६३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com