Water Storage : सिद्धेश्वर धरणात २९.६३ टक्के, येलदरीत ५६.८४ टक्के साठा

Siddheshwar Dam Water Level : परभणी व हिंगोली जिल्ह्यांच्या सीमेवरील पूर्णा नदीवरील सिद्धेश्वर धरणामध्ये मंगळवारी (ता. ३०) सकाळी ८ वाजता २३.९८५ एमएमक्युब (२९.६३ टक्के) व येलदरी धरणामध्ये ४६०.३३७ एमएमक्युब (५६.८४ टक्के) जिवंत पाणीसाठा होता.
Siddheshwar Dam
Siddheshwar DamAgrowon

Parbhani News : परभणी व हिंगोली जिल्ह्यांच्या सीमेवरील पूर्णा नदीवरील सिद्धेश्वर धरणामध्ये मंगळवारी (ता. ३०) सकाळी ८ वाजता २३.९८५ एमएमक्युब (२९.६३ टक्के) व येलदरी धरणामध्ये ४६०.३३७ एमएमक्युब (५६.८४ टक्के) जिवंत पाणीसाठा होता. कालव्यद्वारे सिंचनासाठी पाणी आवर्तन सोडण्यात आल्यामुळे सिद्धेश्वर धरणातील पाणीसाठ्यात मोठी घट झाली आहे.

मागच्या वर्षीच्या पावसाळ्यात पाणलोट क्षेत्रातील जोरदार पावसामुळे येलदरी धरणाच्या खालच्या भागातील पूर्णा नदीवरील सिद्धेश्वर धरण पूर्ण भरले होते. परंतु जानेवारीत कालव्याद्वारे पाणी आवर्तन सोडण्यात आले. त्यामुळे या धरणातील जिवंत पाणीसाठ्यात ५० टक्क्यांहून अधिक घट झाली आहे.

Siddheshwar Dam
Water Storage : निम्न दुधनात १६.९५ टक्के पाणीसाठा

मंगळवारी (ता. ३०) सकाळी आठ वाजता २९.६३ टक्के जिवंत पाणीसाठा शिल्लक होता. गतवर्षी याच तारखेला या धरणात ५९.७५९ एमएमक्युब पाणीसाठा होता. धरण क्षेत्रात १ जून २०२३ पासून आजवर ८९६ मिलिमीटर पाऊस झाला आहे. गतवर्षी (२०२२) १२१५ मिलिमीटर पाऊस झाला होता. १ जून २०२३ पासून धरणात ११३.०४३ एमएमक्युब पाण्याची आवक झाली आहे.

Siddheshwar Dam
Water Storage : सांगली जिल्ह्यात प्रकल्पांमध्ये १० टक्के पाणीसाठा वाढला

१ जुलैपासून या धरणाच्या कालव्यद्वारे ४३.९९४ एमएमक्युब पाणी सिंचनासाठी सोडण्यात आले. पाणी पुरवठ्यासाठी ०.११५ एमएमक्युब राखीव ठेवण्यात आला आहे. उपसा सिंचनाद्वारे २.३२५ एमएमक्युब पाणी वापरण्यात आले. सिद्धेश्वर धरणाच्या वरच्या बाजूच्या येलदरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात २०२३ च्या पावसाळ्यात पावसाचे प्रमाण कमी राहिले.

त्यामुळे आवक कमी असल्यामुळे धरणातील साठ्यात यंदा जेमतेम २.५ टक्के वाढ झाली होती. १ जून २०२३ पासून धरणक्षेत्रात ७०५ मिमी पाऊस झाला. गतवर्षी (२०२२) एकूण ८८८ मिमी पाऊस झाला होता. धरणात १ जून २०२३ पासून एकूण ९६.०७६ एमएमक्युब पाणी आवक झाली. मंगळवारी (ता. ३०) या धरणात ५६.८४ टक्के जिवंत साठा होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com