Kharif Season Agrowon
ॲग्रो विशेष

Kharip Paisewari : सांगली जिल्ह्यातील ३७४ गावांची सुधारित पैसेवारी पन्नासच्या आतच

Kharip Season : जिल्ह्यात खरीप पिकांची सुधारित पैसेवारी जाहीर करण्यात आली असून, ३७४ गावांची पैसेवारी ५० पेक्षा कमी आहे.

Team Agrowon

Sangli News : जिल्ह्यात खरीप पिकांची सुधारित पैसेवारी जाहीर करण्यात आली असून, ३७४ गावांची पैसेवारी ५० पेक्षा कमी आहे. आता डिसेंबरमध्ये अंतिम पैसेवारी आल्यानंतर चित्र स्पष्ट होणार आहे. जिल्ह्यातील तीन मंडले वगळता सर्व जिल्हा दुष्काळ शासनाने जाहीर केला आहे. शासनाच्या या निर्णयानुसार शेतकऱ्यांना वीजबिलातील सवलतीसह कर्ज वसुलीही थांबली आहे.

जिल्ह्यात यंदा पावसाने ओढ दिल्याने पिकांना मोठा फटका बसला. जिल्ह्यातील काही तालुक्यांत तर पावसाने १५ ते २० दिवसांपेक्षा जास्त ओढ दिल्याने पिके कोमेजून जात होती. यामुळे उताराही घटला असून, सोयाबीन या प्रमुख पिकावर अनेक ठिकाणी येलो मोझॅकचा प्रादुर्भाव झाला.

तूर, बाजरी, हळदीची वाढ खुंटली होती. त्यामुळे पीकविम्याची मागणी जिल्हाभर होताना दिसत आहे. तीन मंडले वगळता शासनाने जिल्हा दुष्काळ जाहीर केला आहे. जिल्ह्यातील ६३३ खरीप गावे व रब्बी १०३ गावे अशी एकूण ७३६ गावांपैकी खरीप ६३३ गावांची दि. ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी सुधारित पैसेवारी जाहीर झाली आहे.

त्यात जिल्ह्यातील ३७४ खरीप गावांची पैसेवारी ५० च्या आत आल्याचे दिसून येत आहे. यामध्ये मिरज तालुक्यातील ४१, तासगाव ६९, कवठेमहांकाळ ६०, जत ५४, खानापूर ६८, आटपाडी २६, कडेगाव तालुक्यातील ५६ गावांचा समावेश आहे.

तसेच २५९ गावांची पैसेवारी ५० पेक्षा जास्त आहे. डिसेंबरमध्ये अंतिम पैसेवारी काढल्यानंतरच शासन या पैसेवारीचा विचार करणार आहे. जिल्ह्यात खरीप पेरणीचे दोन लाख ५५ हजार ९८४ हेक्टर आहे. यात खरीप पेरणी केलेले क्षेत्र केवळ एक लाख ५३ हजार ६६ हेक्टर होते.

२५९ गावांची पैसेवारी ५० पेक्षा जास्तच

जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील ३१, पलूस ३५, वाळवा ९८, शिराळा तालुक्यातील ९५ गावे अशी एकूण २५९ गावांची पैसेवारी ५० पेक्षा जास्त आहे. या गावांमधील खरीप पिकांची अंतिम आणेवारी डिसेंबरमध्ये जाहीर होणार आहे. या पैसेवारीकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ahilyanagar Water Crisis: अहिल्यानगर जिल्ह्यात टँकरची संख्या १०७ वर

Irrigation Project Benefits: टेंभू, म्हैसाळमुळे २३०० हेक्टर क्षेत्र झाले हिरवेगार

Tur Cultivation: खानदेशात तूर लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल; क्षेत्रवाढीची शक्यता

Rural Regional Development: सोलापूर जिल्ह्यात आणखी एक आकांक्षित तालुका

Land Acquisition Protest: रिंग रोड भूसंपादनासंदर्भात शेतकऱ्यांचा संताप

SCROLL FOR NEXT