Drought
DroughtAgrowon

Drought News : खरीप गेला अन् रब्बीचीही आशा नाही

Maharashtra Drought Update : यावर्षी वाट पाहत पाहत पावसाळा निघून गेला. मोठा पाऊस झाला नाही. खरिपातील सोयाबीन, मुग, बाजरीची पिके हातची गेली. तुरीचे पीक आता फुलोऱ्यात येण्याआधीच सुकून जात आहे.
Published on

Jalna News : परिसरात यावर्षी पाऊस अत्यंत कमी पडला. रिमझिम पावसावर कशीबशी पिके तरारली, मोठा पाऊस न आल्याने उत्पादनात मोठी घट झाली तर नदी-नाले, विहिरी कोरड्या पडल्या.

यामुळे रब्बीचीही आशा मावळली तर दुसरीकडे दुष्काळग्रस्त भागातून घनसावंगी तालुका वगळल्याने दुष्काळाचे निकष तरी कोणते? असा सवाल शेतकऱ्यांतून उपस्थित केला जात आहे.

Drought
Drought Crisis : सोयाबीन नाहीच; कपाशीलाही आठ-दहा बोंड

यावर्षी वाट पाहत पाहत पावसाळा निघून गेला. मोठा पाऊस झाला नाही. खरिपातील सोयाबीन, मुग, बाजरीची पिके हातची गेली. तुरीचे पीक आता फुलोऱ्यात येण्याआधीच सुकून जात आहे. तर कापसाचे पीक पहिल्याचे वेचणीत लाल पडून वाळून गेले आहे. पाऊस नसल्याने खरिपाची आशा मावळली आहे.

Drought
Maharashtra Drought : उर्वरित महाराष्ट्र काय हिरवा आहे काय?

गहु, हरभरा पेरायला ओल नाही तर जायकवाडी धरणाच्या पाण्यावर लावलेला ऊस करपून वाळून जात आहे. जायकवाडी धरणातून पाण्याच्या पाळीचे नियोजन केल्या गेलेले नाही. जायकवाडीत येणारे पाणी पुन्हा वादात सापडले आहे.

खरीप गेला, रब्बीही जात आहे. पाणी नाही, चारा नाही, पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर होणार आहे. असे असताना मात्र शासनाने जाहीर केलेल्या ४० दुष्काळी तालुक्यांत घनसावंगीचा समावेश नसल्याने दुष्काळाचे निकष तरी काय? असा प्रश्‍न शेतकऱ्यांतून उपस्थित होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com