Team Agrowon
गावगाड्यातले हे दिवस म्हणजे पेरणीच्या लगीन घाईचे.सगळा शिवार पेरणीत गुंग.शेतकरी राजा सगळ्या जगाचा पोशिंदा.शेती हा तर अर्थ व्यवस्थेचा कणा.शेतकरी राजा आज शेतात राबतोय,पीक पिकवतोय म्हणून तर सर्व जग सुखाने खातेय.
गावगाड्यात शेतीची मशागत करणे,बांध घालणे,वेचणे ही कामे वेगाने सुरु आहेत.आम्ही पोर तर लहानपणी सड वेचणे,बांध घालणे ही कामे करायचो.पाट्यावर ,कुळवावर बसायचो कुळवावर बसायची ती मज्जा आज कोणत्याच गाडी बसूण करता येणार नाही.दुपारी शेतात पंगत पडायची.आंबे कच्चे फोडूण लोणचे बणवायचे.काय वेगळेच दिवस असायचे.
आताही गावगाड्यात ही धांदल सुरु आहे.कुरी,बांडग व टोकण पद्धतीने प्रामुख्याने पेरणी चालू आहे.गावातील नामवंत पेरक्या कडुण पेरणी केली जाते.
आजही गावगाड्यात आसे निष्णात पेरके आहेत. पोटाला पणजी -कापड गुंडाळून झोळी बणवली जायचे त्यात भात ओतायचे आणि बांडक्याच्या चाढ्यावर पेरके मुठीतून भात सोडायचे.नळीतून ते भात जमिनीत पेरले जाते.
गावगाड्यात कुःदाड,आचारकी,शिवार,जांभुळ शेत व वाडीच्या रानात एकच धांदल उडायची.पाऊस यायच्या आधीच पेरणी कशी उरकेल याच्याकडे लक्ष आसायचे.मुंबईकर पेरणीसाठी गावगाड्यात येतात व बांडगी -कुरी ओढून पेरणीस मदत करतात.
पैरा व पाव्हणेर पद्धती जरी दुर्मिळ झाल्या असल्या तरी आजही आपल अस्तित्व टिकवून आहेत. एकत्र येऊन पेरणी केली जाते.एकमेकांना जीवेभावे मदत केली जाते.संध्याकाळी ज्यांची पेरणी झाली तृ पाव्हणेर करतात.मटन,चिकण रस्सा जुळणी लावली जाते.पाव्हणेर मुळेकाम लवकर आटोपते.
काही भागात रोपा लावणे प्रकार आहे,तिथे सद्या वाफे तयार करायच काम सुरु आहे.पूर्वी सर्व मशागत बैलाच्या औताने केली जायची पण सद्या यांत्रिक पद्धतीने मशागत केली जात आहे.