Team Agrowon
सुरुवातीला वाट पाहायला लावणाऱ्या नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) दोन दिवसांत वेगाने घोडदौड केली आहे. एकाच दिवसांत विक्रमी प्रगती करत मॉन्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला आहे.
देशाचा बहुतांश भागांत त्याने धडक दिली आहे. पावसाने रविवारी (ता.२५) देखील महाराष्ट्रातील भागांत दमदार, तर भागात मध्यम हजेरी लावली.
पाऊस झालेल्या भागात खरीप पेरणीच्या कामाला वेग आला आहे.
मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यात पेरणी योग्य पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांनी पेरणी करायला घेतली आहे.
निलंगा येथील सुशील पाटसलगे यांच्या शेतातील पेरणीची काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
यंदा मॉन्सूनचं आगमन लांबल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. परंतु देर आये दुरुस्त आये अशा प्रकारे मॉन्सूननं राज्य व्यापलं आहे.