Pune News : शाळेला जाण्यासाठी रस्ता नसल्याने संतापलेल्या चिमुकल्यांनी थेट सरपंचाचीच गाडी अडविल्याचा व्हिडीओ समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरला झाला आहे. दुसरी ते पाचवीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी अगोदर सरपंचाची गाडी अडवली आणि मग त्यावर चिखलफेकही केली. दरम्यान, घडलेल्या प्रकारामुळे गांगरून गेलेल्या सरपंचाची चांगलीच तारांबळ उडाल्याचे व्हिडीओत दिसत आहे.
प्राथमिक माहितीनुसार, हा व्हिडीओ अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील दहिफळ या गावातील आहे. शाळेला जाण्यासाठी रस्ता नसल्याने चिडलेल्या या लहान शाळकरी मुलांनी रस्त्याच्या मागणीसाठी थेट सरपंचाचीच गाडी अडवली. एवढ्यावरच न थांबता या चिमुकल्यांनी सरपंचांला गाडीतून खाली उतरण्यास भाग पाडले. मात्र, गाडीतून खाली चिखलात उतरताना सरपंचाचीही चांगलीच तारांबळ उडाली होती.
व्हिडीओत दिसत असल्याप्रमाणे रस्त्याच्या मागणीसाठी ही चिमुकली मुले चांगलीच आक्रमक झाल्याचे दिसत होते. सरपंचाची गाडी अडविल्यानंतर या मुलांनी गाडीला चिखल रगडून चांगलीच चिखलफेक केली.
लहान मुलांनी आपल्या मागणीसाठी गाडी अडविली तरीही सरंपच गाडीतून खाली पाय ठेवायला तयार नव्हत्या. पण मुलांच्या हट्टापुढे सरपंचांना नमते घ्यायला लागले आणि त्यांना गाडीतून खाली उतारायला भाग पाडले. मात्र, गाडीतून खाली उतरताना चिखलातून स्वत:ला सावरत कसरत करत-करत शेवटी कशाबसा खाली उतरल्या.
दरम्यान, सरपंच खाली उतरताच मुलांनी एकच दंगा करत आम्हाला रस्ता कधी देणार असा थेट सवाल केला. त्यावर सरपंचांनी रस्त्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगतिले. त्यावर मुलांनी सरपंचाना धारेवर धरत रस्ता नसल्यामुळे त्यांना कशा अडचणींचा सामना करावा लागतो आह ते सांगितले.
मुले म्हणाली की, इथे आमचे हाल होत आहेत. लवकर काय तो रस्ता करा. त्यावर सरपंचांनी केवळ 'हो' म्हटले. दरम्यान, हा व्हिडीओ समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.