Monsoon Goat Care : करडांच्या आरोग्याकडे नको दुर्लक्ष

Goat Farming : पावसाळा हा ऋतू करडांसाठी अडचणीचा असतो. या काळात संगोपन, आरोग्य, आहार, लसीकरण, स्वच्छता, आणि रोगप्रतिबंध यांसारख्या सर्व बाबींचे नियोजन आवश्यक आहे. गोठ्याची स्वच्छता ठेवावी. वेळेवर लसीकरण करावे. चांगला आहार द्यावा.
Goat Farming
Goat FarmingAgrowon
Published on
Updated on

डॉ. विष्णू कतुरे

Goat Health Management : शेळ्यांसाठी बांधण्यात येणारा गोठा उंचवट्यावर असावा. छत चांगल्या प्रकारचे असावे. गोठ्याचा मजला झिरपणारा, ओलसर न होणारा ठेवावा. सिमेंट किंवा पक्क्या जमिनीवर लाकडी तक्ता हा चांगला पर्याय आहे.

पावसाळ्यात शेळी तसेच करडांना थंडी जाणवू शकते, त्यामुळे गोठा उबदार ठेवावा. रात्रीच्या वेळी १०० वॅटचा बल्ब लावावा. थंडीपासून संरक्षण व्हावे म्हणून गोठ्याचे दरवाजे आणि खिडक्या योग्य रीतीने झाकाव्यात.

आहार

नवजात करडे

जन्मानंतर ३० मिनिटांच्या आत शेळीचे पहिले दूध (कोलस्ट्रम) देणे अत्यंत आवश्यक आहे. सात दिवसांपर्यंत फक्त आईचे दूध द्यावे.

सुरुवातीच्या दिवसात पिलांना दररोज ४ ते ५ वेळा दूध देण्याची व्यवस्था करावी.

पंधरा दिवसांनंतर कमी प्रमाणात स्टार्टर फीड मात्रा द्यावी. सोबतच खनिज मिश्रणाची मात्रा पिलांच्या खाद्यामध्ये असावी.

पावसाळ्यात ड आणि अ जीवनसत्त्वाची कमतरता होऊ शकते. त्यामुळे सप्लिमेंट्स व लिव्हर टॉनिक द्यावेत.

Goat Farming
Goat Farming : शेळीपालन यशस्वी करण्यासाठी कृत्रिम रेतन

पाणी व्यवस्थापन

स्वच्छ, निर्जंतुक किंवा फिल्टर केलेले पाणी द्यावे.

गढूळ पाण्यामुळे अतिसार व इतर पचनासंबंधी आजार होतात.

कृमी नियंत्रण

जन्मानंतर १ महिन्यानंतर पहिले कृमिनाशक द्यावे.

दर २ ते ३ महिन्यांनी कृमी नियंत्रण करणे अत्यावश्यक आहे.

पावसाळ्यात दूषित पाण्याद्वारे किंवा दूषित चाऱ्याद्वारे पट्टकृमी, गोलकृमी व फुप्फुस कृमी होतात. हे लक्षात घेऊन नियंत्रणाचे उपाय करावेत.

हगवण

करडातील गंभीर समस्या आहे.

आजार पचनसंस्थेशी संबंधित असून, पिलांची वाढ खुंटते, मृत्यूसुद्धा होऊ शकतो.

कारणे

दूषित दूध,पाणी, जीवाणू, कोकसिडिया, कृमी, अचानक वाढलेले दूध, गोठ्याची अस्वच्छता.

लक्षणे

पातळ विष्ठा, रक्त/दूधयुक्त विष्ठा, सुस्ती, ताप, डोळ्यात पाणी, अशक्तपणा.

Goat Farming
Goat Farming: जातिवंत शेळ्या, बोकडांच्या पैदाशीवर भर

उपाय

निर्जंतुक केलेले पाणी आणि ओआरएस मिश्रण द्यावे. पशुतज्ज्ञांच्या सल्ल्याने सलाइन द्यावे.

दुधाची मात्रा अर्धी करावी. सोबतच पचनास योग्य आहार द्यावा.

प्रतिबंध

स्वच्छता, निर्जंतुक केलेले पाणी, वेळेवर लसीकरण, नियमित कृमी नाशन, योग्य दूध देण्याची पद्धत स्वच्छता आणि संसर्ग प्रतिबंध करावा.

दररोज गोठ्याची स्वच्छता करावी.

पायथ्या भागात चुना व ब्लीचिंग करून संसर्ग रोखावा.

डास, माशी, गोचीड यांच्यापासून पिलांचे संरक्षण आवश्यक आहे. शिफारशीत गोचीड नाशकाची फवारणी करावी.

आजारी पिल्ले इतरांपासून वेगळी ठेवावीत.

मानसिक आरोग्य

पिल्लांना आईपासून अकस्मात वेगळे करू नका, त्यामुळे तणाव निर्माण होतो.

गोठ्याच्या बाहेर खेळण्यासाठी सुरक्षित मोकळी जागा ठेवावी.

करडे एकमेकांशी खेळण्याने प्रतिकारशक्ती वाढते.

करडांची वाढ नोंद

दर १५ दिवसांनी वजन मोजावे, नोंद ठेवावी.

वाढ खुंटल्यास तात्काळ कारण शोधून उपाय करावा.जसे कृमी, कुपोषण, आंतरिक आजाराची तपासणी करावी.

लक्षणे ः खाण्यात रस नाही, डोळे पाणावलेले, अंगावर ऊब, अशक्तपणा असेल तर उपचार त्वरित घ्यावा.

- डॉ. विष्णू कतुरे, ८८३०९९०४९६

(पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती, देवणी, जि. लातूर)

Goat Health Care
Goat Health CareAgrowon

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com