ट्रक अनलोड करण्याची पण वेगळीच कला होती. गावातील लोक लगेच मदत करायचे. एका झाडाला सौन्दर बांधायचा ट्रक हळूहळू पुढे घ्यायचा, ट्रकच्या बावडीवर खांबाचे टोक आले, की लोक तिथे खांदे देत आणि ट्रक पुढे घेतला की ...
राज्याने एक दोनदा प्रयत्न केले पण त्याला चढताच येईना. मग आम्ही हसायला लागलो. राज्याच्या कुऱ्हाडीला प्रचंड धार आहे. मेंढपाळाकडे असती तसली फर्सी कुऱ्हाड राज्याकडे आहे.