Goat Management : शेळ्यांचे आहार अन् आरोग्य व्यवस्थापन...

Goat Farming : उन्हाळ्यामध्ये शेळ्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. पाणी आणि चारा व्यवस्थापन योग्य पद्धतीने ठेवावे.
Goat Management
Goat ManagementAgrowon
Published on
Updated on

डॉ. एस. आर. शेख, डॉ. एम.एफ.एम.एफ. सिद्दीकी

Feeding and Health Management of Goats : उन्हाळ्यामध्ये शेळ्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. पाणी आणि चारा व्यवस्थापन योग्य पद्धतीने ठेवावे. आहारामध्ये वाळलेला चारा, हिरवा चारा, खुराक, जवस आणि गव्हाचा कोंडा वापरावा. खाद्यामध्ये खनिजाची थोडीशी मात्रा त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करते.

उन्हाचा कडाका वाढल्याने शेळ्यांना देखील उष्णतेचा त्रास होतो. उन्हाळ्यात फुफ्फुसाचे आजार, यकृत फ्लूक आणि कीटकांच्या प्रादुर्भाव, जीवनसत्त्वाची कमतरता, टिटॅनस, एन्सेफलायटिस या आरोग्यविषयक समस्या दिसतात. उष्णतेच्या ताणामुळे दूध उत्पादन आणि गुणवत्ता कमी होते. शेळ्या उष्णतेच्या ताणास अत्यंत संवेदनाक्षम असतात. निर्जलीकरण ही प्रमुख समस्या आहे. शेळ्यांना शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी आणि त्यांचे आरोग्य राखण्यासाठी भरपूर पाण्याची आवश्यकता असते. उन्हाळ्यामध्ये शेळ्यांना सावलीत ठेवावे. त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. पाणी आणि चारा व्यवस्थापन योग्य पद्धतीने ठेवावे.

Goat Management
Goat Feed Management : उन्हाळ्यात कसं असाव शेळ्यांच्या आहाराच नियोजन

उष्णतेचा ताण

उच्च तापमानामध्ये शेळ्यांचे पुनरुत्पादन आणि दुग्ध व्यवसाय आणि मांस गुणवत्ता यावर परिणाम होतो. शेळ्यांना घाम येत नाही. उष्णतेच्या दिवसांत शरीराचे तापमान कमी ठेवण्याचा प्रयत्न करण्यासाठी त्या नाकपुडीतून जोराने श्‍वास आत घेतात आणि बाहेर काढतात.

शेळीच्या सभोवतालच्या तापमानानुसार सामान्य तापमान १०२.५ अंश फॅरनहाइट ते १०४ अंश फॅरनहाइट असावे. मात्र हायपरथर्मियामुळे तापमान १०७ अंश फॅरनहाइट (४१.७ अंश सेल्सिअस)पेक्षा जास्त असल्यास शेळ्यांचा मृत्यू होऊ शकतो, कारण त्यांच्या पेशी या टप्प्यावर क्षीण होऊ लागतात.

उष्णतेच्या ताणामध्ये शेळ्या जलद श्‍वासोच्छ्वास करतात. सतत धडधडतात. बसून राहतात. त्यांना अशक्तपणा येतो.

आहार आणि पाणी व्यवस्थापन

शेळ्यांना झाडपाल्याची जास्त गरज असते. शेळ्यांना दररोज पाच किलो हिरवा चारा, एक किलो वाळलेल्या चाऱ्याची गरज असते.

शेळीला तिच्या वजनाच्या चार ते पाच टक्के शुष्क पदार्थांची आवश्यकता असते. पशुखाद्याचा विचार केला सुक्या चाऱ्यामध्ये ८९ टक्के आणि हिरव्या चाऱ्यामध्ये २० टक्के शुष्क पदार्थ असतात. एकदल धान्य पिकांमध्ये प्रथिनांचे प्रमाण सात ते अकरा टक्के असते. एकूण पचनीय पोषणतत्त्वे ६५ ते ७० टक्के असतात. द्विदल धान्य पिकांमध्ये प्रथिनांचे प्रमाण १६ ते २० टक्के आणि एकूण पचनीय पोषक तत्त्वांचे प्रमाण ६० ते ६५ टक्के असते.

वाळलेल्या चाऱ्यामध्ये प्रथिनांचे प्रमाण चार ते सहा टक्के असते. एकूण पचनीय पोषक तत्त्वांचे प्रमाण ५० ते ५५ टक्के असते. एकदल चारा पिकांमध्ये मका, कडवळ, बाजरी, ज्वारी, दशरथ घास, गिनी गवत इत्यादींचा समावेश होतो. द्विदल चारा पिकांमध्ये लसूण घास, बरसीम, भुईमूग, चवळी, सोयाबीन इत्यादी चारा पिकांचा समावेश होतो.

आहारामध्ये वाळलेला चारा, हिरवा चारा, खुराक, जवस आणि गव्हाचा कोंडा वापरावा. खाद्यामध्ये खनिजाची थोडीशी मात्रा त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करते.

Goat Management
Goat Management : वाढत्या तापमानातील शेळ्यांचे व्यवस्थापन

शेळ्यांसाठी चारा म्हणून सुबाभूळ, शेवरी, अंजन वृक्ष, डीएचएन ६, गिनी गवत, पॅरा गवत, नेपियर, सुदान गवत, दीनानाथ गवत, मारवेल इत्यादी चाऱ्याची लागवड करावी. पिकांचे उरलेले अवशेष चारा म्हणून वापरता येतात. यामध्ये जाड खोड असलेले अवशेष टाळावेत.

उन्हाळ्यामध्ये शेळ्यांसाठी हिरवा चारा उपलब्ध होत नाही. असला तरी योग्य प्रमाणात नसतो. त्यामुळे शेळ्यांना आवश्‍यक पोषणतत्त्वे मिळत नाहीत. बहुतांश पशुपालक शेळ्या दिवसभर बाहेर चरून आणल्यानंतर रात्री शेडमध्ये बांधून ठेवतात. या पद्धतीमध्ये जो चारा उपलब्ध आहे, तोच चारा शेळ्यांना मिळतो. शेळ्यांना झाडपाल्याची जास्त गरज असते.

आहारामध्ये क्षार मिश्रणाचा वापर केल्यास कमतरतेचे आजार कमी होऊन मांस उत्पादन वाढते.

चरून आल्यानंतर शेळ्यांना सावलीत बांधावे. चरण्यासाठी विनाकारण जास्त अंतर शेळ्यांना चालवू नये. शक्‍यतो उन्हाळ्यात गोठ्यातच चारा खाण्यास द्यावा.

शेळ्यांना थंड, स्वच्छ पुरेसे पाणी उपलब्ध करून द्यावे. २४ तास गरजेनुसार पाणी पिण्यासाठी उपलब्ध होईल याची काळजी घ्यावी.

शेळ्यांना चरण्याकरिता सकाळी लवकर (५ ते ९ दरम्यान) आणि सायंकाळी चराईसाठी सोडावे. शक्य नसल्यास चराई क्षेत्रावर त्यांना दुपारी १२ ते ४ या वेळेत दाट सावलीच्या झाडाखाली ठेवावे. उन्हाळ्यामध्ये ११ ते ४ या दिवसाच्या काळात भरपूर ऊन असते. उन्हामुळे शेळ्यांमध्ये उष्माघाताचे प्रमाण वाढू शकते. काही वेळा शरीरातील पाणी कमी होऊन त्या दगावण्याची शक्यता असते.

निर्जलीकरण झालेल्या शेळ्यांना पुरेसे पाणी द्यावे. गडद रंगाच्या शेळ्यांचे तापमान चांगले ठेवण्यासाठी त्यांच्या अंगावर वेळोवेळी थंड पाण्याचा फवारा करावा.

गोठा व्यवस्थापन

गोठ्याची स्वच्छता ठेवावी. गोठ्यामध्ये हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी. उन्हाळ्यात शेळ्यांना गोठ्यात पुरेशी जागा उपलब्ध करून द्यावी. त्यामुळे गोठ्यातील तापमानात जास्त वाढ होणार नाही.

गोठ्याभोवती उंच सावली देणारी झाडे असल्यास गोठा आणि भोवतीचे वातावरण थंड राहते.

उन्हाळ्यामध्ये शेळ्यांच्या लेंड्यापासून अमोनिया जास्त प्रमाणात बाहेर पडतो. त्यामुळे गोठ्यातील हवा खेळती असणे आवश्यकता आहे. ज्या शेळ्यांचे केस लांब वाढलेले आहेत त्यांची उन्हाळ्यामध्ये कापणी करावी.

उष्णतेचा ताण असलेल्या शेळ्यांना ताबडतोब चांगल्या वायुविजन किंवा हवेचा संचार असलेल्या थंड आणि सावलीच्या ठिकाणी हलवावे. झाडाखाली शेळ्यांना ठेवल्यावर लगेच ताजेतवाने वाटते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com