Team Agrowon
शेळ्यांचा व्यवसायात कमी प्रतीच्या बोकडापासून पैदास केली जाते किंवा बोकड उपलब्ध न झाल्यामुळे शेळ्यांचा माज वाया जाऊन दोन वेतातील अंतर वाढल्याने उत्पादनामध्ये घट होते.
चांगल्या बोकडाचे वीर्य संकलित करून कृत्रिम रेतन पद्धतीचा अवलंब केल्यास चांगले आनुवंशिक गुणधर्म असलेली पिढी निर्माण होऊ शकते.
कृत्रिम रेतन केल्यामुळे चांगले जातिवंत बोकडाच्या विर्याचा वापर होऊन उच्च दर्जाच्या शेळ्या तयार होऊ शकतात.
प्रजननापासून प्रसारित होणाऱ्या आजारांचे संक्रमण थांबविण्यास सुद्धा मदत होऊ शकते.
कृत्रिम रेतन आपण दोन प्रकारे करू शकतो, एक म्हणजे गोठविलेल्या रेत मात्रा वापरून किंवा बोकडाचे ताजे वीर्य वापरून कृत्रिम रेतन करता येऊ शकते.
कृत्रिम रेतनाचे प्रशिक्षण घेणे किंवा तज्ञ पशुवैद्यकाच्या मार्गदर्शनाखाली कृत्रिम रेतन करणे फायदेशीर ठरते.
शेळीपालनात जातिवंत शेळ्यांसाठी निवड पद्धतीचा अवलंब,एकाच वेळी शेळ्या माजावर आणण्याचे तंत्र आणि कृत्रिम रेतन पद्धतीचा वापर करणे आवश्यक आहे.
Animal Vaccination : पावसाळ्यापूर्वी जनावरांना कोणत्या लसी द्याल?