Goat Farming: जातिवंत शेळ्या, बोकडांच्या पैदाशीवर भर

Success Story: पुण्याच्या माळशिरस येथील इंजिनिअर ऋषिकेश मोरे यांनी लॉकडाऊन काळात गावाकडे परतत शेळीपालन व्यवसाय सुरू केला. जातीवंत शेळ्या आणि बोकडांच्या पैदाशीवर भर देत त्यांनी ३०० हून अधिक शेळ्यांचा एक नियोजित, फायदेशीर आणि शाश्वत व्यवसाय उभा केला आहे.
Goat Farming
Goat FarmingAgrowon
Published on
Updated on

Farming Management:

शेतकरी नियोजन । शेळीपालन

शेतकरी : ऋषिकेश दिलीप मोरे

गाव : माळशिरस, ता. पुरंदर, जि. पुणे

एकूण शेळ्या, बोकड : ३५०

एकूण शेती : ३० एकर

पुणे जिल्ह्यातील माळशिरस (ता.पुरंदर) येथील ऋषिकेश मोरे यांची ३०एकर शेती आहे. ऋषिकेश मोरे यांनी मेकॅनिकल इंजिनिअर पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. कोरोना काळात लॉकडाऊन लागल्याने ते गावी आले. दरम्यानच्या काळात वडील दिलीप मोरे यांच्या सल्ल्याने गावाकडे बंदिस्त शेळीपालन सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी बंदिस्त पद्धतीचे शेडची उभारणी केली. संगोपनासाठी ४५ शेळ्या आणि एक बोकड खरेदी करत व्यवसायाची सुरुवात केली.

परंतु शेळीपालनाचा अनुभव नसल्याने सुरुवातीच्या काळात काही अडचणी आल्या. त्यावर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. दत्तात्रय भिसे यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य नियोजन करून मात केली.शेळीपालनाचा अभ्यास करून हळूहळू अनुभवातून शेळ्यांच्या संख्येत वाढ केली. सध्या शेडकडे सोजत आणि तोतापुरी जातीच्या ३५० शेळ्या, बोकड आणि लहान करडांचे संगोपन केले जात आहे. त्यात साधारणपणे १५० बोकड आहेत. त्यात पैदाशीवर भर दिला जातो.

Goat Farming
Goat Farming: शेळीपालनात हंगामनिहाय काटेकोर नियोजनावर भर

बंदिस्त पद्धतीने संगोपन

शेळ्यांसाठी ५ गुंठे क्षेत्रावर १५० बाय ४० फुटांचे बंदिस्त शेड उभारले आहे. त्यात जमिनीपासून उंचीवर फळ्या टाकून कप्पे तयार केले आहेत.

या फळ्यांच्या कप्प्यांमुळे शेळ्यांच्या लेंड्या खाली जमिनीवर पडतात. आणि फळ्या कोरड्या राहून स्वच्छ राखण्यास मदत होते. खाद्य खाण्यासाठी गव्हाणी तयार करण्यात आल्या आहेत.

शेडमध्ये शेळ्या, बोकड आणि लहान करडांचे स्वतंत्र व्यवस्थापन केले जाते. त्यासाठी कप्पे तयार करण्यात आले आहेत. शेळ्यांना शेडमध्येच खाद्य आणि पाणी उपलब्ध करून दिले जाते. त्यामुळे त्यांचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते.

चारा व्यवस्थापन

शेळ्यांसाठी तीन एकरांत चारा

पिकांची लागवड केली आहे. त्यात सुबाभूळ, नेपियर, मका, कडवळ, तुती लागवड करण्यात आली आहे. त्यातून शेळ्यांना दर्जेदार चाऱ्याची उपलब्धता होण्यास मदत झाली आहे.

टंचाईच्या काळात दर्जेदार चारा उपलब्धतेसाठी मका लागवडीतून

५० टन मुरघास निर्मिती केली जाते.

Goat Farming
Goat Farming : आजोबांनी दिली शेळी अन् झाले धन

शेडमध्ये तयार झालेल्या बोकडांची लगेच विक्री न करता त्यांची चांगल्या प्रकारे वाढ केली जाते. त्यासाठी खाद्य व्यवस्थापनावर भर दिला जातो. यामुळे दोन वर्षांच्या कालावधीमध्ये बोकडांचे ७० किलो पासून १२५ किलो वजनापर्यंत वजन भरते. यावर्षी प्रथमच बकरी ईदला बोकड विक्री करण्याचे नियोजन केले. शेडमधील ५० निवडक बोकडांची विक्री करण्यात आली. त्यातून चांगले आर्थिक उत्पन्न हाती आले. खरेदीदारांनी थेट शेडवर येऊन बोकडांची पाहणी करून खरेदी केली. त्यामुळे विक्रीसाठी बाजारात जाण्याची आवश्यकता भासली नाही. सध्या शेडमध्ये लहान-मोठे १५० बोकड आहेत. पुढील वर्षीच्या बकरी ईदसाठी त्यांची जोपासना केली जाईल.

आरोग्य व्यवस्थापन

शेडमधील शेळ्यांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी प्रतिबंधात्मक लसीकरण, खाद्य व्यवस्थापनावर भर दिला जातो.

वेळोवेळी जंतनाशकाची मात्रा दिली जाते. नवजात करडांची विशेष काळजी घेतली जाते. प्रतिबंधात्मक लसीकरणावर भर दिल्यामुळे शेळ्यांचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. पशुवैद्यकीय तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली नियमित आरोग्य तपासणी केली जाते.

खाद्य व्यवस्थापन, शेड स्वच्छतेवर भर दिल्यामुळे शेळ्यांचे आरोग्य उत्तम राहते.

आजारी शेळ्या आणि बोकडांचे स्वतंत्र व्यवस्थापन केले जाते.

केवळ ब्रिडिंगवर भर

व्यवसायाच्या सुरुवातीस अनेक अडचणी आल्या. त्यावर मात करण्यासाठी पुणे येथे शेळीपालनाचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर राजस्थान येथून जातिवंत शेळ्या आणि बोकडांची खरेदी केली. व्यवसाय सुरू केल्यानंतर सुरुवातीची अडीच वर्षे शेडमधील शेळ्यांची संख्या वाढविण्यावर भर देण्यात आला. त्यावेळी शेळ्या आणि बोकडांची विक्री केली नाही. या दोन वर्षांच्या कालावधीत केवळ ब्रिडिंगवर भर देण्यात आला. त्यातून जातिवंत शेळ्या आणि बोकडांची पैदास करून व्यवसाय वृद्धींगत केला. बोकडांचे अपेक्षित वजन मिळविण्यासाठी त्यांच्या खाद्य आणि आरोग्य व्यवस्थापनावर भर दिला जातो. यावर्षी बकरी ईदला खरेदीदारांना ५० बोकडांची नगानुसार विक्री करण्यात आली.

- ऋषिकेश मोरे, ८२३७१३०८८८

(शब्दांकन : संदीप नवले)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com